Sharad Pawar Video: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे संस्थापक आणि अध्यक्ष, शरद पवार यांनी अलीकडेच ८३ व्या वर्षात पदार्पण करत आपला वाढदिवस साजरा केला. तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांचे नाव घेताच महाराष्ट्रातील राजकारण, पावसात उभं राहून केलेलं भाषण अशी दृश्य डोळ्यासमोर येतात. पण याच शरद पवारांमध्ये एक सुप्त कलाकार दडलेला आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. शरद पवार हे केवळ कलाप्रेमी नसून त्यांनी स्वतः त्यांच्या आयुष्यात एका नाटकातून काम केले आहे. बारामती शहरात नव्याने उभारलेल्या कलादालनात पवारांच्या पहिल्या नाटकातील रूपाची भव्य प्रतिमा लावण्यात आली आहे.

बारामती शहरातील नटराज नाट्य कला मंडळ यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कलादालनात एका प्रतिमेच्या रूपात शरद पवारांचे कधीही न पाहिलेले रूप पाहायला मिळते. १ सप्टेंबर २०२२ रोजी अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या कलादालनाचे उद्घाटन झाले होते. कलादालनात प्रवेश करताच सुरुवातीला नटराजाची सुंदर मूर्ती व त्यापाठीपाठ शरद पवार यांची नाटकातील भूमिका दाखवणारा फोटो लावण्यात आला आहे.

आपण खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की शरद पवारांनी १९६० साली आपल्या आयुष्यातील पहिले वहिले नाटक वंदे भारतममधून रंगमंचावर पदार्पण केले होते. यात पवारांनी कल्याण ही भूमिका साकारली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार जेव्हा नाटकात काम करतात..

दरम्यान, यापूर्वी शरद पवार यांनी नाटकप्रेमी व कलाकारांना वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. ८० च्या दशकात जेव्हा घाशीराम कोतवाल या नाटकाचा प्रयोग जर्मनी येथे होणार होता तेव्हा अनेकांनी या नाटकाला विरोध केला होता. अशावेळी डॉ. जब्बार पटेल आणि डॉ मोहन आगाशे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर यांच्या मदतीने पवारांनी ‘घाशीराम कोतवाल’च्या टीमसाठी पुणे-मुंबई चार्टर विमानाची सोय केली होती.