‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या वाक्याची प्रचिती देणारी अनेक उदाहरणं तुम्ही आजवर ऐकली असतील, पाहिली असतील. प्राण्यांमध्येही अशी मदतीची भावना असते हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड भुकेलेल्या हरणांची मदत करत असल्याचे दिसत आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हरणांचा झाडाची पानं खाण्याचा प्रयत्न सुरू आहे हे लक्षात येते. झाडाच्या फांद्यांपर्यंत पोहचता येत नसल्याने या हरणांना ती पानं खाता येत नसल्याचे तिथल्या माकडाच्या लक्षात येते. यावर हे माकड लगेच झाडावरून खाली येत त्या फांदीवर बसतो. माकडाच्या वजनामुळे फांदी खाली वाकते आणि हरणांना सहज त्यावरील पानं खाता येतात. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: CCTV: साखळीचोरांना तिने चांगलीच अद्दल घडवली! बाइकवरून खाली पाडले अन्…; पाहा Viral Video

सुशांत नंदा यांनी शेअर केलेला व्हिडीओ:

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरणांना मदत करण्याची माकडाची ही भावना नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. प्राण्यांमध्येही मदतीची भावना असते हे या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.