Shirtless Fight in Biman Bangladesh Flight Video: मागील कित्येक वर्षात आपण बस- ट्रेनमध्ये होणारी तुंबळ हाणामारी पाहिली होती. अर्थात इथे गर्दीच एवढी असते, सीट अडवण्यावरून खिडकीपाशी बसण्यावरून, टॉयलेटवरून एक ना अनेक कारणांनी वाद होतात. पण सहसा विमानात असे होण्याचे कारण नाही. म्हणजे निदान प्रत्येकाला बसायला मिळणार, चौथ्या सीटवर सरकून बसावे लागणार नाही, उभं राहताना कोणाला धक्का लागणार नाही एवढी सोय असताना वादाची कारणं आधीच दूर झालेली असतात. पण तरीही मागील काही दिवसात विमान प्रवासात अत्यंत धक्कादायक घटना होत असल्याचे दिसत आहे. आता तर हद्दच होईल असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका प्रवाशाने चक्क शर्ट काढून हाणामारी केली आहे.

बिमान बांगलादेशच्या एअर- बोईंग ७७७ या विमानात दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादाने अत्यंत हिंसक रूप धारण केले होते. यामध्ये एक प्रवासी तर चक्क शर्ट काढून दुसऱ्याशी चढ्या आवाजात भांडताना दिसत आहे. नेमका वाद कशामुळे सुरु झाला हे कळले नसले तरी त्या दोघांचा चेहरा बघता मोठं काहीतरी कारण असावं असं वाटत आहे. यात शर्ट न घातलेला माणूस हा दुसऱ्या प्रवाशाला सीटवरून बाहेर खेचत आहे यानंतर बसलेला माणूस इतका चिडतो की तो थेट त्या प्रवाशाला कानाखाली मारतो. ज्याने त्याचा राग अजून वाढतो व हाणामारी सुरु होते यात शर्ट काढलेला माणूस रडतानाही दिसत आहे.

शर्ट काढून विमानात हाणामारी

हे ही वाचा << Video: तापलेल्या तेलात तळायला टाकलेली मच्छी जिवंत झाली; शेफच्या हातावर तेल उडवलं, अन् शेवटी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अन्य प्रवासी मध्यस्थी करून हे भांडण सोडवायचा प्रयत्न करतात. विमान प्रवासातील भांडणाची सुरुवात ही इंडिगो विमानात हवाई सुंदरी व प्रवाश्यामध्ये झालेल्या बाचाबाचीने झाली होती. यानंतर थायलंडवरून येणाऱ्या विमानात प्रवाशांची मारामारी, एअर इंडियाच्या विमानात बिजनेस क्लासमध्ये एका प्रवाशाने महिलेवर लघु शंका करणे या व अशा अनेक धक्कादायक घटना लागोपाठ घडत गेल्या. यावरून आता विमान प्रवासही फारसा सोयीचा राहिलेला नाही असं म्हणायला हवं.