video shows son goes on hunger strike for iPhone : मोबाईलपासून ते अगदी गाडीपर्यंत एखादी गोष्ट घरच्यांकडून मिळाली नाही की, काही जण रुसून बसतात, तर काही जण हट्ट करतात. आई-बाबांशी भांडणे, घरी न जेवणे, दिवसभर मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर राहणे, घरच्यांचे पैसे खर्च करणे आदी अनेक गोष्टींचा या हट्टामध्ये समावेश असतो. पण, आपण ज्या वस्तूसाठी हट्ट करतोय ती तितकी महत्वाची आहे का याचा सुद्धा आपण विचार करत नाही. तर आज सोशल मीडियावर असंच काहीतरी पाहायला मिळालं आहे. एका मुलाने आपल्या आईकडे आयफोन घेण्याचा हट्ट केला आहे.
एका फूल विकणाऱ्या आईच्या मुलाने आयफोनची मागणी केली. त्याच्या आईने महागडा मोबाईल आयफोन देण्यास नकार दिल्यावर मुलाने जेवण खायचे सोडून दिले. चक्क तीन दिवस त्याने काही सुद्धा खाल्लं नाही आणि अखेर आईला त्याच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. आईने त्याला आयफोन घेऊन दिला. नेटकऱ्यांनी त्याच्या आईची धडपड आणि परिश्रम समजून न घेतल्याबद्दल त्या मुलाची निंदा केली होती. पण, पुढे काय घडलं व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
वक्त वक्त की बात है….
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मुलगा मोबाईलच्या दुकानात आयफोन खरेदी करण्यासाठी हातात पैसे घेऊन उभा आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्याला ‘कोणता फोन घेतो आहेस असं विचारले?’ तेव्हा ‘मी आयफोन घेतो आहे माझ्या आईने मला सर्व पैसे दिले’ असे तो सांगतो. त्यानंतर आई सांगते की, “मी मंदिराबाहेर फुले विकते, माझ्या मुलाने तीन दिवसात काहीही खाल्ले नाही. कारण – तो सतत आयफोन मागत होता. पण फोन खरेदी करताना जेवढे पैसे दिले तेवढेच पैसे तो मला नोकरी करून, परत देणार’ ; असे वचनही मुलाने आईला दिलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @gharkekalesh या एक्स (ट्विटर) वर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये या व्हिडीओ बद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. नेटकरी देखील हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एक युजर म्हणतोय की, “तुम्ही त्या आयफोनचे काय कराल? जर तुम्ही ते पैसे काही चांगल्या कामासाठी वापरले असते तर तुमचे आणि तुमच्या आईचे आयुष्य अजून चांगले झाले असते. तर दुसरा युजर म्हणतोय की, “आता तो रील अर्थव्यवस्थेत योगदान देईल कारण खऱ्या अर्थव्यवस्थेत कोणालाही रस नाही.” तर तिसरा युजर म्हणतोय की, वक्त वक्त की बात है, जमाने के साथ बॅच्चेभी बदलते जा रहे हैं (काळानुसार मुलंही बदलत चालली आहेत )” ; आदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.