Video Shows Elder Brother Desi Jugaad : आपण आजपर्यंत अनेक भावा-बहिणींच्या नात्याबद्दल ऐकले वा पाहिले असेल. भाऊ बहिणीसाठी जीव ओवाळून टाकू शकतो. पण, दुसरीकडे दोन सख्खे भाऊ मात्र एकमेकांचे तोंड बघणेही पसंत करत नाहीत. एकीकडे दोन भाऊ अनेकदा कुरबुरी करताना आणि एकमेकांशी भांडताना दिसतात, तर दुसरीकडे जेव्हा अडचण येते तेव्हा फक्त भाऊ दुसऱ्या भावाच्या खांद्याला खांदा लावून उभेसुद्धा असतात. तर आज नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये (Video) दोन भावंडांमधील सुंदर क्षण पाहायला मिळाला आहे, जो पाहून तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल…

व्हायरल व्हिडीओत (Video) दोन सख्खे भाऊ आपापसात खेळताना दिसत आहेत. व्हिडीओनुसार मोठ्या भावाला बहुतेक नवीन सायकल घेऊन दिलेली असते. हे पाहून छोट्या भावालादेखील मोठ्या भावाची सायकल चालवायची असते. पण, दुसरा भाऊ खूपच छोटा असल्यामुळे त्याला या सायकलवर बसवणे धोकादायक असते, म्हणून मोठा भाऊ एक जबरदस्त जुगाड करतो, जेणेकरून त्याला सायकलवर बसवावेसुद्धा लागणार नाही आणि त्याची सायकल चालवण्याची हौसदेखील पूर्ण होईल.

व्हिडीओ नक्की बघा…

शेवटी भाऊ हा भाऊच असतो…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, छोटा चिमुकला भाऊ बाबा गाडीमध्ये बसलेला असतो. पण, त्याला मोठ्या भावाच्या सायकलवर बसण्याचासुद्धा आनंद घ्यायचा असतो. आपल्या भावाला खेळवण्यासाठी आणि नवीन सायकलचा त्याला आनंद घेता यावा म्हणून मोठा भाऊ आपल्या छोट्या भावाला बाबा गाडीमध्ये बसवतो, छोट्या भावाला सायकलची सीट पकडण्यास सांगतो आणि सायकल चालवण्यास सुरुवात करतो. यामुळे छोट्या भावाचा हट्ट पूर्ण झाला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lyrical_simmy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून दोन्ही भावांच्या जणू प्रेमात पडले आहेत आणि ‘जगातील सर्वात सुंदर व्हिडीओ आणि बेस्ट भाऊ’, ‘शेवटी भाऊ हा भाऊच असतो’, ‘मोठे झाल्यावर हे प्रेम कुठे जाते’ आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत; तर काही जण मोठ्या भावाचा हा जुगाड पाहून कमेंट्समध्ये पोट धरून हसताना दिसून आले आहेत.