Video Shows Man Dance For His wife On Wedding Anniversary : लग्नाचा २५ वा वाढदिवस म्हणजे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एक खास गोष्ट असते. लग्नाच्या या २५ वर्षांच्या प्रवासात अनेकदा भांडणे, अनेक दुःख तर अनेक सुखाचे क्षणसुद्धा अनुभवलेले असतात. त्यामुळे त्यांना या प्रवासाची आठवण करून देण्यासाठी अनेक जण जोडप्याचे पुन्हा एकदा लग्न लावतात. एकेमकांबद्दलच्या प्रवासाबद्दल सांगतात किंवा विशेष गिफ्ट देऊन जोडीदाराला खूश करतात. पण, आज एक अनोखा व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये आपल्या बायकोसाठी पतीने खास डान्स केलेला दिसतो आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार (Video) जोडप्याच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस एका कार्यक्रमात साजरा होताना दिसतो आहे. हॉलमध्ये अनेक नातेवाईक, त्यांची मुले, मित्र-मैत्रिणी उपस्थित असतात. पण, या सगळ्यात अजिबात न लाजता, जोडीदार आपल्या पत्नीसाठी शाहरुख खानच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘ये लड़का हाय अल्ला’ या हिट गाण्यावर नाचताना दिसत आहे. अगदी हातवारे करून, वेगवगळे हावभाव करत डान्स करणाऱ्या जोडीदाराचा व्हिडीओ तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, ‘ये लड़का हाय अल्ला’ या गाण्यावर नवरा आपल्या पत्नीसाठी डान्स करतो आहे. गाण्याच्या ओळींद्वारे तो आपल्या पत्नीवर असणारे प्रेम व्यक्त करतोय. हे पाहून बायकोदेखील त्याच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करते आणि लाजताना दिसते आहे. प्रेम काळाबरोबर कमी होत नाही, फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधावे लागतात; याचे उत्तम उदाहरण आज व्हिडीओत पाहायला मिळाले आहे असे म्हणायला हरकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्फोमन्स पाहून चेहऱ्यावर हसू आले

कार्यक्रमात उपस्थित @sakshi__bisht1 या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि ‘२५ वर्षांनंतर जर आपणपण असेच दिसणार असू तर मी तुला हो बोलायला तयार आहे’; अशी सुदंर कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा ‘काकांचा परफॉर्मन्स पाहून चेहऱ्यावर हसू आले, व्हिडीओ बघून खूप मजा आली’; आदी अनेक कमेंट करताना दिसत आहेत. आपल्या आई-बाबांकडे पाहिल्यावर आपल्यालासुद्धा असाच वर्षानुवर्षे साथ देणारा आणि प्रेम व्यक्त करणारा जोडीदार हवा अशी इच्छा आजकालच्या तरुण मंडळींची असते.