Stray Dog Viral Video : माणुसकी दिवसेंदिवस संपत चालली आहे असे म्हणतात ते उगाच नाही. आपल्या आसपास इतक्या भयानक घटना घडत आहे ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. सोशल मीडियावर असाच एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून लोकांचा माणूसकीवरील विश्वास उडेल. व्हायरल व्हिडीओमध्ये एका निष्पाप भटक्या कुत्र्याला बांधून काठीने मारहाण केल्याचे दिसत आहे. ही घटना दिल्लीतील करावल नगरमध्ये घडली आहे आणि या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. क्रूर कृत्याबद्दल आरोपांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमी करत आहेत.

भटक्या कुत्र्याला अमानुष मारहाण

वृत्तानुसार, ही घटना दिल्लीतील करावल नगरमधील शिव विहार येथील गल्ली क्रमांक ३ (११००९४) येथे घडली. निष्पाप प्राण्याला मारणाऱ्या लोकांच्या अमानुष कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर “@shubham43264499” या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

क्रुरतेचा कळस

या कथित क्रूरतेमागील कारण अद्याप समजलेले नाही. पण, परिसरातील रहिवासी पोलिसांना आरोपींना ओळखून अटक करण्याची विनंती करत आहेत.काही इंटरनेट वापरकर्ते कठोर शिक्षेची मागणी करत आहेत, असा दावा करत आहेत की,”रस्त्यावरील निष्पाप आणि निराधार प्राण्याला इजा करण्याचा किंवा मारण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तेही इतके क्रूरपणे.

प्राणी प्रेमींनी व्यक्त केला रोष

प्राणीप्रेमींनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिल्ली पोलि‍सांना टॅग केले आणि म्हटले की, “दिल्लीच्या करावल नगर भागात काही घृणास्पद लोकांनी एका मुक्या प्राण्याला मारहाण केली. दिल्ली पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर पकडावे आणि त्यांचा एन्काउंटर करावा. मुक्या प्राण्याला मारण्याचा अधिकार कोणालाही नाही. स्थान – गल्ली क्रमांक ३, शिव विहार, करावल नगर, दिल्ली ११००९४.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


या प्रकरणासंदर्भात अद्याप कोणत्याही पोलिस कारवाईचे वृत्त नाही. करावल नगरचे भाजप आमदार आणि केंद्रीय मंत्री कपिल मिश्रा यांनीही या घटनेची दखल घ्यावी आणि आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी इंटरनेट वापरकर्ते करत आहेत. घटनेची नेमकी वेळ आणि तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, पण हा व्हिडिओ मंगळवारी (१५ एप्रिल) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. एफपीजे व्हिडिओच्या सत्यतेची हमी देत ​​नाही.