आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात, ज्या पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असे हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. वास्तविक, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अचानक एक रिक्षा चालकाविना रस्त्यावर चालू लागली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

नक्की काय झालं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक रिक्षा रस्त्यावर उभी असल्याचे दिसत आहे. एक माणूस रस्त्यावरून जात असताना अचानक रिक्षा सुरू होऊन रस्त्यावर पुढे जाऊ लागते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीला हे दृष्य पाहताच तो आश्चर्यचकित होतो, तो खूप प्रयत्न करतो, पण रिक्षा थांबवता येत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे.

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर चक्क हत्तीने धरला ठेका!; Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर एका यूजरने म्हटले आहे – मिस्टर इंडिया तर नाहीये ना? दुसर्‍या व्यक्तीने लिहिले – हा जबरदस्त व्हिडीओ आहे.