Viral Video Today: कोणतीही बाई ही मुळातच शांत स्वभावाची असते कारण निसर्गाने सुद्धा स्वतः स्त्रीला सहनशीलतेचं वरदान दिलं आहे. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. तसंच एखाद्या महिलेच्या सहनशीलतेला सुद्धा काही सीमा असतात, आणि जेव्हा या सीमा वारंवार ओलांडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा समुद्रासारखी शांत स्त्री त्सुनामीसारखी उफाळून येते. याची अनेक उदाहरणे आपण यापूर्वीही पाहिली आहेत. मात्र आज नव्याने व्हायरल होणारा एक व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तुम्ही झी मराठीवर सुरु असणारी तू चाल पुढं मालिका पाहिली असेल तर तसंच काहीसं खऱ्या आयुष्यात घडताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेच्या दारुड्या नवऱ्याने पार्लरमध्ये येऊन धिंगाणा घातल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
तुम्ही बघू शकता की ही महिला व तिच्या नवऱ्याचे काहीतरी वाद सुरु होते. कदाचित ते भांडण सोडून महिला आपल्या कामावर आली होती. याच रागाने तिचा दारुडा नवरा तिच्या पार्लरमध्ये पोहोचला व तिला घरी चल असे म्हणत धमकावू लागला. यावर त्या महिलेने त्याला शांत राहण्यास सांगितलं व मी माझे काम करत आहे, तू इथून निघून जा असेही ती म्हणाली आणि पुन्हा समोरच्या ग्राहक महिलेचा मसाज करू लागली. यावर चिडून त्या दारुड्याने चक्क ग्राहक महिलेचे केस धरून ओढायला सुरुवात केली. हे बघताच त्या बाईचा संताप झाला आणि मग तिने टीशर्टचा गळा धरून आपल्या नवऱ्याला रुद्रावतार दाखवला. हा सर्व प्रकार ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
ब्युटी पार्लरमध्ये तुफान हाणामारी
हे ही वाचा<< मुलीच्या जन्माने हादरलं कुटुंब; पायगुण नव्हे तर ‘हे’ पाय बघूनच डॉक्टर झाले थक्क, पाहा Viral फोटो
दरम्यान, ज्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला ते एक मीम्स व मजेशीर व्हिडीओ शेअर करणारे पेज आहे, हा ही व्हिडो कदाचित स्क्रिप्टेड असू शकतो. पण ही वृत्ती खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळते. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी जरी हा स्क्रिप्टेड व्हिडीओ असेल तरी प्रत्येक स्त्रीने यातुन काहीतरी बोध घ्यायला हवा अशा कमेंट केल्या आहेत.