सध्या सर्वत्र एस्केलेटर म्हणजेच धावते जिने आपल्याला पाहायला मिळतात. मॉल, विमानतळ, मेट्रो, रेल्वे स्टेशन, अशा अनेक ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी एस्केलेटर लावलेलं पाहायला मिळतं. पण हे जितकं सोयीचं आहे तितकंच धोक्याचंही आहे.जिने चढण्याचा त्रास नको म्हणून एस्केलेटर म्हणजे स्वयंचलित जिन्यांची निर्मिती झाली. बस्सं फक्त या जिन्यांवर उभं राहून आपल्याला आपोआप वर जातं येतं. काही लोकांना तर यावरून जाण्यात मजाच येते. अशाच एक एस्केलेटरचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही एस्केलेटरवर पाय ठेवण्याआधी दहावेळा विचार कराल.

अचानक तुटला एस्केलेटर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तीन एस्केलेटर दिसत आहेत. दोन उतरण्याचे आहेत, तर एक चढण्याचा. एस्केलेटरवरूनही लोक चालत उतरताना दिसत आहेत. एक काळ्या रंगाचं जॅकेट घातलेली व्यक्ती जसं या एस्केलेटरवर पाय ठेवते, तशी मोठी दुर्घटना घडते. अचानक एस्केलेटर मधूनच तुटतो. एस्केलेटरचा काही भाग मागे राहतो आणि काही भाग पुढे जातो. दरवाजा उघडावा तसा हा एस्केलेटर उघडतो. सुरुवाताल व्यक्ती आपल्या हातांनी एस्केलेटरच्या वरच्या भागाला ठरून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. पण खाली चालत्या एस्केलेटरमध्ये तिचा पाय अडकतो आणि ती आत खेचली जाते. हळूहळू व्यक्ती त्यात सामावली जाते आणि वरून एस्केलेटर बंद होतं. ती व्यक्ती एस्केलेटरच्या आत जाते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: पठ्ठ्या हॉटेलमध्ये ओढत होता सिगारेट; वडिलांनी पाहिलं अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे.