वन्य प्राणी रस्ता ओलांडतानाचे व्हिडीओ अनेकवेळा व्हायरल होत असतात. काही वेळा ते आपला जीवही गमावतात याचं कारण की लोक प्राण्यांकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडू देत नाहीत. परंतु अनेकवेळा हे प्राणी सहज रस्ता ओलंडतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अजगर रस्ता ओलांडताना दिसत आहे. हा अजगर एवढा प्रचंड आहे की त्याला पाहून कोणीही घाबरेल.

एवढा मोठा अजगर पाहून लोकांना आश्चर्य वाटले. काही लोकांनी हा अजगर खूपच सुंदर असल्याचे सांगितले, तर काहींनी कमेंट करत हा एवढा मोठा अजगर पाहून त्यांना खूप भिती वाटली असही सांगितलं. तुम्ही कधी इतका मोठा अजगर प्रत्यक्षात बघितला आहे?

(हे ही वाचा: Video: श्रीवल्ली गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स viral; नेटीझन्स म्हणतात ‘सगळ्यात गोड पुष्पा हाच’)

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपला आहे एक फोन; तुम्ही शोधू शकता का?)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे- वन्य प्राण्यांनाही नेहमी वाटेने जाण्याचा अधिकार आहे. कृपया त्यांना सुरक्षित रस्ता द्या.