एक काळ असा होता की चित्रपट सोडता ‘मौत का कुआं’ मध्ये वेगवेगळे धोकादायक स्टंट बघायला मिळायचे. ज्यामध्ये स्टंटमन मोटारसायकल किंवा कारवर उभे राहून किंवा बसून धोकादायक स्टंट दाखवत असत. पण आज जगात कुठेही जा कोणी ना कोणी तुम्हाला स्टंट करताना दिसेलच. वास्तविक, सध्या लोकांमध्ये स्टंटबाजीची क्रेझ खूप वाढली आहे. विशेषत: तरुणांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे.
मात्र, स्टंट करणे वाटते तितके सोपे नाही. यासाठी तुम्हाला कठोर सराव करावा लागतो. काहींना स्टंट करताना एवढा आत्मविश्वास येतो की ते बिनधास्त आणि धोकादायक ठिकाणी सहज स्टंट करू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस धोकादायक डोंगराच्या माथ्यावरून बॅकफ्लिप मारताना दिसत आहे.
(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो माणूस जिठे डोंगरावर उभा आहे, तिथून खाली एक मोठा उतार आहे जिथून तो खाली पडला तर काहीही होऊ शकते, पण त्याची पर्वा न करता तो तिथे स्टंट करण्याचा विचार करतो. टेकडीच्या अगदी टोकावर उभा राहून, तो बॅकफ्लिप करतो. त्याचा तोल बिघडला किंवा पाय घसरला तरी तो थेट डोंगरावरून खाली पडला असता, पण त्याने ज्या पद्धतीने परफेक्ट स्टंट केला, त्यावरून त्याने यासाठी कठोर सराव केला असावा, असे वाटत होते.
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
(हे ही वाचा: Pune Metro: पुणे मेट्रोतील दोन बायकांचा भांडणाचा मजेशीर Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर Havenreels नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ५ लाख ४२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर १७ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्स करत तरुणाचा स्टंट धोकादायक असल्याचे म्हटले आहे.