सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अनेक ट्रेंडही सेट होत असतात. नेहमीच सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी हे ट्रेंड चुकवणे कठीण असते, विशेषत: जर त्यात डान्स करायचा असेल तर. नुकतेच आलेले ‘जिगल जिगल’ डान्स चॅलेंज हे त्याचे उदाहरण आहे. हा ट्रेंड इतका ट्रेंड होत आहे की, एका महिलेने दिल्ली मेट्रोमध्ये त्यावर डान्स करत सगळ्यांना तिची नोंद घेयला भाग पाडलं.

काशिकाबस्सी यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिच्या इंस्टाग्राम बायो नुसार ती ‘स्टार मिस टीन कॅपिटल ऑफ इंडिया २०२१’ आणि मिस दिल्ली २०२१’ आहे. त्यात तिचा ‘अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि गायिका’ असाही उल्लेख आहे.लाल-पोल्का डॉट जंपसूट घातलेली काशिकाबस्सी महिला दिल्ली मेट्रोमध्ये ‘माय मनी डोन्ट जिगल जिगल’ ट्रेंडची हुक स्टेप करत आहे.

(हे ही वाचा: जन गन मन… थेट माउंट एव्हरेस्टवरुन; भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा राष्ट्रगीत गातानाचा Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: Video: मोदींनी आठ वर्षात ‘इतक्या’ देशांना दिली भेट; जाणून घ्या खर्चाचा आकडा)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

२१ मे रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ ४०० हजारापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि १९,००० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. या महिलेच्या आत्मविश्वासाचे अनेकांनी कौतुक केले आहे.