Goat viral video: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी वेगळे आणि हसवणारे व्हिडीओ व्हायरल होतात. परंतु, काही प्रसंग इतके अनपेक्षित आणि क्यूट असतात की, त्यांना पाहून लोक हसतात आणि प्रभावित होतात. अलीकडेच असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात गावातील एक महिला मॉलमध्ये बकऱ्या घेऊन स्वयंचलित शिडीवर चढतेय. तिच्या साध्याभोळ्या स्वभावातील निरागसपणाचे दर्शन घडविणाऱ्या या व्हिडीओने लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हिडिओमध्ये एक महिला मॉलमधील स्वयंचलित शिड्यांवर स्वतः चढताना दिसते, आणि तिने एकाच वेळी दोन बकऱ्यांनादेखील सोबत घेतले आहेत. सुरुवातीला बकऱ्या थोड्या घाबरलेल्या होत्या, त्या मागे वळणताना दिसत आहे. परंतु महिला दोऱ्याच्या साह्याने त्यांना हळूहळू शिड्यांवर चढवते.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल झाला आहे—इन्स्टाग्रामवर official_sudhir_raja_100k आणि ट्विटरवर @ArshadK96995026 युजर्सनी शेअर केला आहे. अनेकांना ही दृश्य बघून हसू आले, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केले. महिला हसत बकऱ्यांशी सौम्यपणे वागताना दिसते, ज्यामुळे तिच्या निरागस स्वभावाकडे लोकांचे लक्ष गेले. मॉलमध्ये बकऱ्यांसह अशी अद्भुत घटना पाहून हा व्हिडिओ खूप चर्चेचा विषय ठरला आहे.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. स्वयंचलित शिडीवर बकऱ्यांसोबत महिला चालत असल्याचा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला. तसेच एक लाख १७ हजारांहून अधिक व्ह्युज या व्हिडीओला आले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आणि हास्य व्यक्त केले. तर काहींनी हे धोकादायक असल्याचे सांगितले.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “बकरी महत्त्वाची आहे, ट्रिगर होऊ नका, फक्त फन पोस्ट आहे.” काही युजर्सनी कमेंट करीत म्हटले, “बिहार आहे भइया, येथे काहीही शक्य आहे.” तर दुसऱ्यांनी म्हटले, “कोणीतरी तिला थांबवा आणि विचारा की, तिने बकरीसाठी तिकीट घेतले आहे का? बिचारी बकरी जाऊ इच्छित नाही.” तर तिसऱ्याने म्हटले “तिला बकऱ्यांबद्दल विशेष प्रेम आहे”. या व्हायरल व्हिडीओमुळे लोकांच्या मनातील हसू आणि आश्चर्य अशा दोन्ही भावनांना चालना मिळाली आहे.