यूपीमध्ये कासगंज येथे एका महिलेच्या अंगावरून मालगाडी गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जवळपास ३० सेंकद महिला मालगाडीच्या खाली पडून होती. मृत्यूला इतक्या जवळून सामोरे गेल्यानंतर या महिलेला काही काळ धक्का बसला होता. दरम्यान, हे दृश्य पाहून उपस्थितांचा मात्र जीव कंठाशी आला आला होता. ते लोक महिलेला मालगाडी पुढे जाईपर्यंत हलू नको असे सांगत होते. महिलेला नंतर मालगाडी खालून सुखरुप बाहेर काढण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार ही, महिला घरातून औषध घ्यायला निघाली होती आणि रेल्वे टॅक क्रास करून दुसरीकडे जात होती.

हेही वाचा – ‘रिमझिम गिरे सावन’ गाण्याच्या रिक्रिएशनचे आनंद महिंद्राही झाले फॅन; ट्विट करत म्हणाले, ‘आयुष्य तुम्हाला हवं तसं…’

रविवारी दुपारी कासगंज शहरात आर्यनगरमध्ये राहाणारी ४० वर्षीय हरप्यारी सहावर गेट रेल्वे क्रॉसिंग पार करून औषध घ्यायला जात होती. ट्रॅकवर मालगाडी येत होती पण तिचे लक्ष नव्हतं. ज्याक्षणी ती ट्रॅक ओलांडत होती त्यावेळी मालगाडी आली. मालगाडी पाहून हरप्यारी घाबरली आणि ट्रॅकवरच पडली. चांगली गोष्ट अशी ती ट्रॅकच्या मधोमध पडली होती.

हेही वाचा – ”तुझी हिंम्मत कशी झाली?”, लेकीला स्पर्श केल्यामुळे प्रवाशावर संतापले वडील; विमानात झाला गोंधळ!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इकडे मालगाडी तिच्या वरून जात होती आणि दुसरीकडे घटनास्थळी उपस्थित लोकांचा श्वास अडकला होता. तिथे बघ्यांची गर्दी झाली होती. हरप्यारी रुळाच्या मधोमध पडलेली असून तिच्यावरून मालगाडी जात असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आजूबाजूचे लोक तिला हलचाल करण्यास मनाई करत आहेत. जवळपास तीस सेंकद हरप्यारी मालीगाडीच्या खाली ट्रॅकवर पडून होती. घटनेची माहिती मिळताच लोको पायलटने ट्रेन थांबवली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तिला बाहेर काढले. आता हरप्यारीसोबतच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.