सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ प्राण्यांचे असतात, कधी लहान मुलांचे, तर कधी देसी जुगाडाचे. त्याचप्रमाणे अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. कधीकधी हे सीसीटीव्ही व्हिडीओ गमतीशीर असतात तर कधी हे व्हिडीओ फारच धक्कादायक असतात. सध्या अशी एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही आजवर अनेक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असतील. हे व्हिडीओ फारच धक्कादायक असतात. यातील अनेक व्हिडीओमध्ये रेल्वे पोलीस कर्मचारी प्रवाशांचा जीव वाचवताना दिसतात. प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपघात घडतात. परंतु हे कर्मचारी प्रसंगावधान राखत सेवेला तत्पर असतात. अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक कर्मचारी प्लॅटफॉर्मवर उभा आहे. तितक्यात त्याला एक व्यक्ती रेल्वे रूळ क्रॉस करताना दिसते. दुर्दैवाने त्याचवेळी एक भरधाव वेगाने जाणारी ट्रेन त्याच रुळावरून जाणार असते. रूळ क्रॉस करणारी व्यक्ती वृद्ध असते. तेव्हा या पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तत्परतेने या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर खेचले. त्याच क्षणी त्या रुळावरून एक ट्रेन वेगाने जाते. हा व्हिडीओ पाहताना काळजाचा ठोका चुकतो.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

@ANINewsUP या ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ७७ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘ललितपूरमध्ये आज धोकादायकपणे रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध महिलेचा जीव रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वाचवला.’ सोशल मीडियावर या कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.