Wedding video: लग्नात नवरा-नवरी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करतात. नातेवाइकांमध्ये लग्नात अनेकदा नाराजी पाहायला मिळते. अनेक नातेवाईक नावं ठेवण्यात व्यस्थ असतात. काही लोक जेवणाला नावं ठेवतात तर काही नवरा नवरीच्या कपड्यांवरुन बोलतात. या सगळ्यापासून दूर, मित्र फक्त मौजमजा करण्यासाठी येतात आणि वधू-वरांच्या आनंदात सामील होतात. भारतात फक्त मित्रमंडळींना आमंत्रित करुन लग्न करणे शक्य नाही मात्र परदेशात असे केले जाते. असाच एक लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फक्त मित्रांनी सहभाग घेतला आहे.

नवरा नवरीच्या या लग्नातील एन्ट्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या पार्टीत सगळे नाचताना दिसत आहे. नवरा-नवरीचे मित्र त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत. दोघेही प्रवेश करताच मित्र पाहून नाचू लागतात. या लग्नात या जोडप्याने नातेवाईकांना न बोलवता फक्त मित्र मंडळींना बोलवलं आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुमच्या लग्नात मित्रांना आमंत्रित करा, नातेवाईकांना नाही. कुटुंबातील सदस्य आणि तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या लोकांना आमंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कुत्रा आणि मालकाची हृदयस्पर्शी भेट; ३ वर्षांनीही मालकाला ओळखलं, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडिओला जवळपास ३ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.