साप, अजगर किंवा कोणत्याही सरपटणाऱ्या प्राण्याला पाहताच अनेकांना घाम फुटतो. कारण- हे प्राणी केव्हाही माणसावर जीवघेणा हल्ला करतात. अशात काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अनेक जण अशा प्राण्यांपासून दोन हात लांबच राहतात. पण असेही काही लोक आहेत की, जे या प्राण्यांबरोबर अगदी आपला मित्र असल्याप्रमाणे वागतात. कधी ते त्यांच्या टोळीत जाऊन बसतात, त्यांच्यासोबत काही वेळ राहतात आणि नंतर त्या प्राण्यांना जंगलात नेऊन सोडून देतात; पण असे दृश्य पाहतानाही कोणालाही धडकी भरते. पण, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये निधड्या छातीची एक व्यक्ती महाकाय अजगरांच्या वेटोळ्यात जाऊन बसली आहे. आपल्याला एका अजगराजवळ जायला सांगितले तरी हात-पाय थरथरतात; पण ही व्यक्ती अगदी बिनधास्तपणे त्या अजगरांमध्ये बसली आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य अनेकांना अवास्तव वाटतेय. तसेच एखादी व्यक्ती अशा प्रकारे भयंकर प्राण्यांबरोबर कशी काय राहू शकते, असा प्रश्न काहींना पडला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती भल्यामोठ्या डझनभर अजगरांच्या टोळी असलेल्या वेटोळ्यात जाऊन बसली आहे. त्या अजगरांनी त्याला चारही बाजूंनी विळखा घातला आहे आणि तरीही त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भीतीचे भाव दिसत नाहीत. उलट तो त्यांच्यात बसून काहीतरी बोलताना दिसतोय. अशा प्रकारे अजगरांमध्ये बसणे म्हणजे आपल्या जीवाशी केलेला एक प्रकारचा खेळ आहे. त्यामुळे हा व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवतो. पण, अनेकांनी त्या व्यक्तीच्या धाडसाचे खूप कौतुक केले आहे.
इन्स्टाग्रामवर @snakesrealm नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला आतापर्यंत १७ हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर, मोठ्या संख्येने लोक हा व्हिडीओ शेअर करीत आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे; तर काहींनी हा व्हिडीओ भयावह असल्याचे वर्णन केले आहे.
एका युजरने कमेंट करीत म्हटलेय की, अरे देवा, हे खूप भयानक आहे. तर, अनेकांनी अजगरांमध्ये बसलेल्या त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. एकाने म्हटलेय की, यार, तुझ्या शौर्याला मी सलाम करतो.