Indian Railways Passenger Experience In Viral Post : ट्रेनप्रवास जितका आरामदायी असतो तितकाच तो डोकेदुखी सुद्धा ठरतो. तिकीट बुकिंग, त्रास देणारे प्रवासी, टॉयलेटच्या बाजूला असणारी सीट, ट्रेनमध्ये येणाऱ्या खाद्यपदार्थांबद्दल चिंता आदी अनेक समस्या आपल्याला प्रवासादरम्यान जाणवतात. अशातच अनेकदा आपण वृद्ध माणसांना बघून त्यांना बसायला जागा सुद्धा देतो. पण, कधी कधी प्रामाणिकपणा आपल्याच अंगाशी येतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट असेच काहीतरी सांगते आहे. लोअर बर्थचे वैध तिकीट घेऊन एक प्रवासी उज्जैनला जात होता.

भारतीय रेल्वेच्या प्रवाशाने रेडिटवर त्याचा ट्रेन प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. तर ही घटना उज्जैनला जाताना घडली. जिथे त्याच्याकडे लोअर बर्थची सीट कन्फर्म असूनही त्याला प्रवासासाठी बराच संघर्ष करावा लागला. ‘r/indianrailways’ या रेडिट अकाउंटवरून पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, ते उज्जैनला जाण्यासाठी प्रवास करत होते. त्यांना लोअर बर्थची सीट मिळाली होती. त्यानंतर काही वेळाने चाळीशीच्या आसपासच्या काही पुरुषांचा एक ग्रुप डब्यात घुसला आणि त्यांच्या सीटवर बसू लागले.

जेवणाची वेळ जवळ येताच एका माणसाने प्रवाशाला तात्पुरते बसण्याची विनंती केली. जेणेकरून सर्वजण एकत्र जेवायला बसू शकतील. प्रवासी मदत करण्यास तयार तर झाला. पण, जेव्हा अज्ञात माणसे जास्त वेळ थांबली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली. कारण – ते चक्क एका तासाहून अधिक काळ जेवत होते. त्यांनी त्यांचे कपडे लटकवण्यासाठी हॅन्गरचा वापर केला. त्यामुळे इतरांना त्याचा वापर करता आला नाही. त्यांनी या ग्रुपचा एक फोटो देखील शेअर केला, ज्यामध्ये त्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत होते.

पोस्ट नक्की बघा…

Sick of being kind everytime
byu/lost-fella inindianrailways

दयाळूपणा आता कमकुवतपणा म्हणून पाहिला जातो (Viral Photo)

जेव्हा प्रवाशाने सीट मागितली तेव्हा अज्ञात पुरुषांच्या ग्रुपने “अरे, तो तरुण आहे, तो कुठेही बसू शकतो. आपण म्हातारे होत चाललो आहोत” असे म्हणाला. पण, इंट्रोव्हर्ट असल्याने प्रवाशाला त्यांच्याशी कसे वागावे हे माहित किंवा कळत नव्हते. ही सगळी घटना पाहून प्रवाशाने पोस्टमध्ये स्वतःची व्यथा मांडली की, “वय लोकांना अधिकाराची खोटी भावना का देते. आपण वडीलधाऱ्यांना माणसांचा ‘आदर’ करण्यासाठी करार केला आहे का? काही वयस्कर लोकांना असे का वाटते की ते त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर अधिकार दाखवू शकतात” ; असे काही प्रश्न प्रवाशाने पोस्टद्वारे विचारले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट @lost-fella या reddit अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. “प्रत्येक वेळी दयाळू राहण्याचा कंटाळा येतो” अशी कॅप्शन पोस्टला दिली आहे. पोस्ट व्हायरल होताच अनेक युजर्स “दयाळूपणा आता कमकुवतपणा म्हणून पाहिला जातो. खंबीर राहा. तुम्ही तिकिटासाठी पैसे दिले आहेत”, “तुम्हाला जास्त विनम्र राहण्याची गरज नाही” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत. भारतीय रेल्वेमध्ये अशाच परिस्थितीचा सामना करणाऱ्या इतरांसाठी ही पोस्ट एक आधारस्तंभ बनली, जिथे थोडीशी दयाळूपणा अनेकदा कमकुवतपणा समजला जातो.