Viral Photo Shows Man Balancing Chair On The Chin : आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये कोरण्यासाठी अनेक जण अजब-गजब स्टंट करीत असतात. कोणी डोक्यानं नारळ फोडतात, तर काही कोणी हाताने विटा फोडतात. आता एका रेकॉर्डब्रेकर माणसाने या सगळ्यांना मागे टाकत हात, पायानं किंवा डोक्यानं नाही तर चक्क हनुवटीवर खुर्ची ठेवून अनोखा पराक्रम केला आहे. अजब विक्रम करणाऱ्या या तरुणाबद्दल या लेखातून सविस्तर जाऊन घेऊया…

अमेरिकन रेकॉर्डब्रेकर डेव्हिड रशने एक अनोखा स्टंट सगळ्यांसमोर करून दाखवला आहे. याआधी त्यांनी १८० हून अधिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स त्याने स्वतःच्या नावावर नोंदवले आहेत. तर आता डेव्हिड रशने १ तास, २० मिनिटे आणि ३० सेकंद हनुवटीवर खुर्ची ठेवली. डेव्हिडने हा स्टंट पूर्ण करून स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

२०२१ मध्ये स्पेनच्या ख्रिश्चन रॉबर्टो लोपेझ रॉड्रिग्जने १ तास, १९ मिनिटे आणि १७ सेकंद हनुवटीवर खुर्ची ठेवण्याचा रेकॉर्ड केला होता. ख्रिश्चन रॉबर्टो लोपेझ रॉड्रिग्ज यांच्या आधी डेव्हिड यांनी १ तास, ८ मिनिटे आणि ३७ सेकंद हनुवटीवर खुर्ची ठेवून हा स्टंट केला होता. तर विजेतेपद परत जिंकण्याचा दृढनिश्चय असलेल्या डेव्हिडने हा विक्रम मोठ्या फरकाने मोडण्याचा प्रयत्न करायचे ठरवले आणि जोरदार तयारी केली.

अमेरिकन रेकॉर्डब्रेकर डेव्हिड रशने हा अनोखा विक्रम आयडाहोच्या बोईस येथील वेस्ट बोईस वायएमसीए येथे करण्यात आला . या कामगिरीसाठी, डेव्हिडने लोवेजच्या तपकिरी प्रौढ आकाराच्या अॅडम्स लो-बॅक पॅटिओ चेअरचा वापर केला, ज्याचे वजन ४ पौंड ३.५ औंस होते आणि उंची अंदाजे ३१.५ इंच होती.खुर्चीला हनुवटीवर उलटे ठेवून, डेव्हिड त्याची पाठ सरळ, चेहरा वरच्या दिशेला ठेवून उभा राहिला आणि अखेर १ तास, २० मिनिटे आणि ३० सेकंदात एक नवीन विश्वविक्रम नोंदवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाच दिवसात १५ विक्रम

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील १८० हून अधिक जेतेपदे जिंकणारा दिग्गज खेळाडू डेव्हिड रशने गिनीजचे एकाच दिवसात १५ विक्रम मोडले. तीन सफरचंदांना खेळवत त्याचे एका मिनिटांत १९८ लहान चावे घेतले.