Viral Photo Shows Auto Rickshaw Driver Travels With His Pet Dog : जगात विविध प्रकारचे प्राणी राहतात, त्यापैकी काही अतिशय धोकादायक, काही अतिशय शांत, तर काही अगदीच खोडकर असतात. ते लक्षात घेऊन, प्रत्येक जण आपापल्या सोई वा आपापल्या आवडीनुसार घरातसुद्धा काही प्राणी पाळतात. तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यासाठी काय करू शकता, असे जर तुम्हाला विचारले, तर तुम्ही काय उत्तर द्याल? विचार करताय… मग सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो बघा. एका रिक्षाचालकाने आपला पाळीव प्राणी २४ तास आपल्याबरोबर राहावा म्हणून त्याची खास सोय केली आहे.

इन्स्टाग्राम युजर @shikhu_here आणि एक्स (ट्विटर) युजर @damnyanti यांनी बंगळुरूमध्ये रिक्षातून प्रवास करताना त्यांनी अनुभवलेली एक खास गोष्ट शेअर केली. बंगळुरूमध्ये राहणारा अण्णा हा रिक्षाचालक आपल्या पाळीव प्राण्याला बरोबर घेऊन रिक्षा चालवतो. या पाळीव श्वानाचे नाव जॅकी (Jacky) असे आहे. जवळजवळ दोन वर्षांपासून हे दोघे बंगळुरू शहरामध्ये रिक्षाद्वारे एकत्र प्रवास करतात आणि प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवतात. रिक्षाचालक अण्णा आणि त्याचा पाळीव प्राणी जॅकी यांचे खास बॉण्डिंग एकदा तुम्हीसुद्धा बघा…

पोस्ट आणि व्हिडीओ नक्की बघा…

पीक बंगळुरू मोमेंट

जॅकी हा श्वान अवघ्या चार दिवसांचा असल्यापासून रिक्षाचालकाबरोबर राहत आहे. आता जॅकी त्याच्याबरोबर रिक्षातून प्रवासदेखील करतो. तसेच हा पाळीव श्वान रिक्षाचालक अण्णा बसतो तिथे उभा राहून प्रवास करतो आणि त्याने कोणाला नुकसान पोहोचवू नये यासाठी त्याला एक पट्टासुद्धा बांधून ठेवलेला आहे, जे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो आणि व्हिडीओ @shikhu_here व @damnyanti या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आपण याला पीक बंगळुरू मोमेंट (Peak Bangalore moment) म्हणू शकतो का, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो आणि व्हिडीओ पाहून रिक्षाचालकाचे कौतुक करीत आहेत. तसेच एका युजरने, ‘आता पाळीव श्वानाच्या अंगावर क्यूआर कोड चिकटवून त्याला पैसेसुद्धा घ्यायला सांगा’, अशी मजेशीर कमेंट केली आहे.