UPSC Aspirant Sold Notes And Books To Raddi : नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले आपल्यातील अनेक जण असतात. पण, केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे काम नाही. दरवर्षी लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात आणि परीक्षेला बसतात, ज्यामुळे परीक्षा आणखीन आव्हानात्मक ठरते. अनेक विद्यार्थ्यांना एकाच प्रयत्नात यश मिळते तर अनेकांना सतत अपयशाचा सामना करावा लागतो. याचबद्दल बोलताना, कोलकाता येथील एका विद्यार्थिनीने परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर तिची वह्या-पुस्तके भंगारात विकण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके, नोट्स आणि इतर अनेक साहित्य खरेदी करावी लागतात. यासंबंधित अदिती जयस्वालने एक्स (ट्विटर) वर काही फोटो पोस्ट केले आहेत. परीक्षा नापास झाल्यावर तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी बनवलेल्या काही नोट्स आणि पुस्तकांना विकून देण्याचे ठरवले. यासाठी तिने वह्या-पुस्तके भंगारात विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि वजन करण्याचे ठरवले. तसेच त्याच्या बदलत्यात तिला फक्त २३० रुपये देण्यात आले आहेत. तसेच या नोट्स आणि पुस्तकांची एकूण किंमत १ लाख रुपये होती.
त्रास देणाऱ्या आठवणींना सोडून देणंच चांगले (Viral Post)
तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते, ‘शेवटी माझ्या नोट्स आणि काही पुस्तके भंगारात विकली गेली… अनेकांनी मला सुचवले की, ‘ तू या नोट्स कोणालातरी द्यायला पाहिजे होत्यास. पण, हे फक्त सांगणे सोपे आहे. ‘ही परीक्षेत पास झाली नाही’ (iska toh nai hua) हे जर लोकांना माहित असेल तर कोणालाही अशा नोट्स घ्यायच्या नसणार एवढं तर मला माहिती आहे. असो, जर कोणाला पुस्तके हवी असतील आणि जर ती व्यक्ती कोलकात्यात राहत असेल तर माझ्याकडे अजूनही ही पुस्तके आहेत आणि मी तुम्हाला देण्यास नेहमीच तयार असेन’ ; अशी कॅप्शन दिली आहे.
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारी @jaiswal_adt ही पोस्ट पाहताच अदितीच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आणि तिला पाठिंबा देत ‘त्रास देणाऱ्या आठवणींना सोडून देणंच चांगले आहे’, ‘पुढे तुझ्यासाठी काहीतरी चांगले लिहून ठेवले असेल’, ‘मी सुद्धा ६ प्रयत्नांनंतर असेच केले’, ‘एक स्वप्न तुटले तर दुसरे सुरू होते. मी एकदा SIMC मुलाखतीत नापास झालो होतो. पत्रकारितेबद्दल काहीच माहिती नव्हती. पण नंतर स्वतःला सावरले आणि @OfficialPU मध्ये उत्तीर्ण झालो’, ‘मी माझ्या नीट परीक्षेच्या पुस्तकांचे सुद्धा असेच केले. मला अनेक जण म्हणाले तुझी मेहनात आहे आठवण म्हणून ठेवून दे. पण, जेव्हा आपण या नोट्स पाहतो आणि स्वतःबद्दल वाईट बघतो तेव्हा मनात काय भावना येते मी समजू शकतो ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.