Trending Tweet Today: ट्रेन व बसमध्ये अनेकदा इतकी गर्दी असते की अनेकांना उभं राहुन, घुसमटून जावं लागतं. अशावेळी एखादी बाई उभी असेल तर तिला बसायला लगेच जागा करून द्यावी असा अलिखित नियमच असतो. अनेक पुरुष हा नियम अगदी न सांगता पाळतातही. पण समजा एखाद्या वेळेस गर्दी नसेल आणि पुरुष उभा असेल तर अनेक महिला त्याला बसण्यास जागा देतीलच असे नाही. अनेकदा तर सोशल मीडियावर या मुद्द्यावरून वाद झाले आहेत. स्त्री इतर ठिकाणी सहन करते मग तिच्यासाठी राखीव जागा असतील तर त्यात गैर काय असा प्रश्न केला जातो. खरंतर यात गैर नाही शिवाय हा सरकारने महिलांना दिलेला अधिकार आहे मात्र माणुसकीच्या पुढे हा नियम किती महत्त्वाचा असावा हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. यावर भाष्य करणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे.

भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS) डॉ. सुमित्रा मिश्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटला एक फोटो शेअर केला आहे ज्यावरून पुन्हा एकदा स्त्री- पुरुष समानतेचा विषय चर्चेत आला आहे. आपण पाहू शकता की मेट्रोमधील या फोटोत एक स्त्री दोन माणसांची जागा अडवून बसली आहे आपण तिच्या बाजूलाच एक तरुण उभा आहे. खरंतर ही स्त्री त्याला जागा देऊ शकली असती किंवा तिने नंतर दिली असेलही पण या फोटोमधील वास्तव हे तितकंच खरं आहे.

सुमित्रा मिश्रा यांनी हा फोटो शेअर करताना ” अनेकदा स्त्री सुद्धा चुकीची असते” असे कॅप्शन दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या फोटोवर १० हजाराहून अधिक लाईक्स आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून जर आता या जागी एखादा पुरुष असता तर फेक फेमिनिस्ट पुढे येऊन हल्लाबोल करू लागल्या असत्या असे म्हंटले आहे. तुम्हाला असा अनुभव आहे का? आणि अशा परिस्थितीत नेमकी चूक कोणाची असं तुम्हाला वाटत आम्हाला नक्की कळवा.