गावी किंवा अचानक फिरायला जायचा प्लॅन ठरतो तेव्हा आपण काही महिने आधीच ट्रेनचे बुकिंग करून ठेवतो किंवा तत्काळमध्ये तिकीट काढतो. पण, ती तत्काळ तिकीट वेळेत बुक करणे आवश्यक आहे. तर सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एक व्यक्ती तत्काळमध्ये तिकीट बुक करण्यासाठी महत्त्वाची मीटिंग रद्द करते.
ऑफिसच्या संस्थापक स्नेहा यांनी सह-संस्थापक आणि त्यांच्यातील मजेशीर संवाद शेअर केला आहे. मेसेजच्या स्क्रीनशॉटमध्ये सह-संस्थापकाचे नाव ब्लर करून हा मेसेज पोस्ट करण्यात आला आहे. तर यात युजरने लिहिले आहे की, मी आयआरसीटीसीवर तत्काळ तिकीट बुक करत आहे. मी १०:०० ते १०:१५ या वेळेत उपलब्ध नसेन, त्यामुळे मीटिंग रद्द करावी लागेल; असा संदेश पाठवण्यात आला आहे. व्हायरल पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…
पोस्ट नक्की बघा :
तत्काळ तिकीट हा एकमेव पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही त्वरित तिकीट मिळवू शकता. प्रवासाची तारीख वगळता हे तिकीट एक दिवस अगोदर बुक केले जाऊ शकते. पण, ही बुकिंग प्रक्रिया काही नियमांसह येते. एसी तिकिटे सकाळी १०, तर नॉन-एसी तिकिटे सकाळी ११ वाजल्यापासून काही मिनिटांसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट निर्धारित वेळेत बुक करणे आवश्यक असते. तर हे लक्षात ठेवून व्यक्तीने आपली महत्त्वाची मीटिंग रद्द करत तत्काळमध्ये तिकीट काढण्याला प्राधान्य दिलं आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @itspsneha या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. तसेच ‘मीटिंगला हजर न राहण्याचे बेस्ट कारण सांगण्याचा’ हा यंदाचा पुरस्कार माझ्या सह-संस्थापकाला जातो, अशी मजेशीर कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे आणि सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.