Viral Post Pune Doctor Providing Free Delivery Services For Girls : घरचं असो वा ऑफिसचं; काम करताना मोटिवेशनची भरपूर गरज असते. त्यासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आठवड्याच्या सुरुवातीला सगळ्यांना प्रोत्साहित करीत असतात. त्यासाठी ते आपल्याच सगळ्यांमधील सुपर हीरोची एखादी गोष्ट निवडून, सोशल मीडियावर ती पोस्ट करून, सगळ्यांना प्रेरित करण्याच्या प्रयत्नात असतात. काल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पुण्यातील एका डॉक्टरचे मुलींच्या संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय मोहिमेबद्दल कौतुक केलं आहे. कोण आहेत हे डॉक्टर चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊ…

डी. प्रशांत नायर यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये डॉक्टर गणेश राख यांची गोष्ट शेअर केली आहे, जी नंतर महिंद्रा यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून रिपोस्ट केली आहे. डी. प्रशांत नायर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका कामगाराचा अनुभव सांगितला आहे; ज्यानं आपल्या बायकोला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. बायकोच्या सिझेरियनचा खर्च भागवण्यासाठी त्याला आपलं घर गहाण ठेवावे लागेल. बाळाच्या जन्मानंतर त्यानं काळजीपोटी लिंगाबद्दल डॉक्टरांना विचारणा केली. ‘मुलगी झाली आहे’, असं डॉक्टरांनी सांगताच वडिलांनी रुग्णालयाच्या बिलाबद्दल विचारले. “जेव्हा एंजल जन्माला येतात तेव्हा मी कोणतंही शुल्क आकारत नाही”, असं डॉक्टर नकळत म्हणाले. डॉक्टरांचे ते शब्द कानी पडताच वडील भारावून गेले आणि डॉक्टरांच्या पाया पडून त्यांना ते देव म्हणू लागले.

१,००० हून अधिक बाळांना मोफत जन्म (Viral Post)

तर पुण्यातील डॉक्टर गणेश राख १० वर्षांपासून मुलगी जन्माला आली, तर एक पैसाही घेत नाहीत. डॉक्टर गणेश राख यांच्या ‘सेव्ह द गर्ल चाइल्ड’ उपक्रमाने सीमा ओलांडल्या आहेत आणि जागतिक स्तरावर बदल घडवून आणला आहे. आतापर्यंत त्यांनी मुलगी झालेल्या १,००० हून अधिक बाळांना मोफत जन्म दिला आहे.

पोस्ट नक्की बघा…

तर @DPrasanthNair डी. प्रशांत नायर यांची पोस्ट एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणाले, “दोन मुलींचा बाप म्हणून सांगतो तुमच्या घरात एंजल जन्माला येतो तेव्हा काय होते याची मला दुप्पट माहिती आहे. पण, हा डॉक्टरसुद्धा कृपेचा आणि उदारतेचा एक एंजल (देवदूतच) आहे, असे सांगत त्यांनी सगळ्यांना खास संदेश दिला आणि म्हणाले की, आठवड्याची सुरुवात सगळ्यात चांगली करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःला प्रश्न विचारणे की, माझी उद्दिष्टं आणि माझं काम समाजावर सकारात्मक परिणाम कसा करील.“ त्यांची ही पोस्ट अनेकांना प्रेरणा देणारी अशीच आहे नाही का?