Auto Driver Sweet Gestures For His Pet Dog : प्राणीप्रेमी असणारे अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राण्यांना पाळतात. मांजर, कुत्रा, कासव, ससा आदी अनेक प्राण्यांना आवडीने घरी घेऊन येतात आणि त्यांची काळजी घेतात. घरात राहणारे पाळीव प्राणी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच असतात. काही जण त्यांचा वाढदिवस, डोहाळे जेवण सुद्धा अगदी थाटामाटात साजरे करतात. तर काही जण अगदी कामावर जातानाही या प्राण्यांना आपल्याबरोबर घेऊन जातात. पण, आज सोशल मीडियावर अशी एक पोस्ट व्हायरल होते आहे; जी पाहून तुम्ही थक्क होऊन जाल…
Reddit युजरबरोबर पाच दिवसांपूर्वी एक गोष्ट घडली आहे; जी तिने इंतरांबरोबर शेअर करण्याचे ठरवले आहे. इंटर्नशिपसाठी बंगळुरूला आलेल्या प्रवाशाने ओला ऑटो बुक केली. तसेच तिने रिक्षा चालकाला फोन करून सांगितले की, तिला उशीर होईल असे कळवले. प्रवासी येईपर्यंत रिक्षा चालक भटक्या श्वानांना बिस्किटे खाऊ घालत होता. त्यानंतर प्रवासी रिक्षात जाऊन बसली. पण, त्यानंतर तिने जी पाहिलं ते खरंच डोळे पाणवणारं होतं. चालकाने रिक्षात लावलेली खास वस्तू पाहून एका प्रवाशाला खूप वाईट वाटले.
अशा प्रकारचे लोकं खजिना असतात (Viral Post)
चालकाने त्यांच्या रिक्षात दिवंगत पाळीव श्वानाचा फोटो ठेवला होता. त्याचा पाळीव श्वान जो फक्त ४ महिन्यांचा होता; तो बरोबर एक महिन्यापूर्वीच वारला होता. त्याच्या आठवणीत रिक्षा चालकाने रिक्षात त्याचा फोटो रिक्षात त्याच्या फोटोच्या अगदी बाजूला चिटकवाला होता. हे पाहून प्रवाशाने रिक्षातून उतरताना भटक्या श्वानांसाठी आणखी बिस्किटे खरेदी करण्यासाठी जास्तीचे १०० दिले. सुरुवातीला त्याने नकार दिला. पण, प्रवाशाने त्याला सांगितले की, हे जास्तीचे पैसे तुमच्यासाठी नाही तर तुम्ही खाऊ घालता त्या गोंडस भटक्या श्वानांसाठी आहेत.
पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट Reddit अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. पोस्टमध्ये “कृपया मला या व्यक्तीची माहिती कळवा. मी जेव्हा जेव्हा बंगळुरूमध्ये माझ्या घरी येईन तेव्हा त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारचे लोक एक खजिना आहेत. फक्त आपण त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला पाहिजे”, “आज इंटरनेटवर मी पाहिलेली सर्वोत्तम गोष्ट”, “मला खूप रडू आले. बिचारे श्वानाचे पिल्लू. मला माहित आहे की, या माणसाने त्याचा खूप चांगला सांभाळ केला असेल” , “आता मी पण माझ्या पालकांच्या फोटोसह रिओचा (त्याच्या पाळीव कुत्र्याचा) फोटो ठेवणार” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी पोस्टखाली करताना दिसून आले आहेत.