IFS officer Praveen Kaswan Shares Stunning Drone Image : जंगलातील प्रत्येक प्राण्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे; जे त्या प्राण्याला आणखीन खास करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल नवनवीन गोष्टी ऐकायला किंवा ते कशाप्रकारे आयुष्य जगतात त्यांच्याबद्दल आपल्यालाही जाणून घेण्याची तितकीच उत्सुकता असते. तर याबद्दल आयएफएस अधिकारी परवीन कासवान त्यांच्या युजर्सना वन्यजीवांबद्दल नेहमी नवनवीन गोष्टी पोस्टद्वारे सांगत असतात. पण, आज त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो हत्तींच्या वाढत्या लोकसंख्येचे चिन्ह दाखवतो आहे.

भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी पश्चिम बंगालमधील जलदापारा राष्ट्रीय उद्यानात ड्रोनद्वारे काढलेल्या ४० हून अधिक हत्तींच्या कळपाचा एक आकर्षक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सगळीकडे हिरवळ आणि मधोमध हत्ती आणि त्यांची लहान पिल्ले दिसत आहे. ड्रोनने काढलेल्या या दृश्याने ऑनलाइन वन्यजीव प्रेमींचे लक्ष वेधले आहे आणि या पोस्टला आत्तापर्यंत ४०,८०० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हे दृश्य डिस्कव्हरी चॅनलच्या कव्हरेजसारखे आहे (Viral Post)

तर भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी हा फोटो पहिला आणि त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच या दृश्याचे वर्णन करताना “आपल्या राष्ट्रीय उद्यानात तब्बल ४० हत्तींचा एक भव्य कळप दिसला; त्यात लहान खेळकर पिल्लेही आहेत. यावरून हत्ती निरोगी आहेत आणि त्यांची संख्या चांगली वाढतेय हे समजते आहे; हे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपले आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.

पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर ही पोस्ट @ParveenKaswan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत आणि “वाह. हे आश्चर्यकारक आहे. विश्वास बसत नाहीये की हे भारत आहे”, “अप्रतिम”, “काही युजर्सनी या कळपाची आणखीन काही झलक पाहण्याची विनंती केली”, “हे डिस्कव्हरी चॅनलच्या कव्हरेजसारखे आहे,” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत. याआधी, निवृत्त आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आईच्या मांडीवर झोपलेल्या हत्तीच्या पिल्लाचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला होता; जो व्हायरल झाला होता.