Specially Abled IndiGo Passenger Staff : विमान प्रवास प्रत्येक प्रवाशांसाठी खास असतो. पण, अनेकदा चेक-इन काउंटरवर लांब रांगेत उभं राहण्याचा कंटाळा येतो. काही जणांचे सामान जास्त असते, तर काही जणांना मनासारखी जागा मिळत नाही. मग अशावेळी विमानतळावर नेमून दिलेले कर्मचारी प्रवाशांवर चिडतात, त्यांना दुर्लक्ष करून अगदी तासंतास वाट बघायला लावतात. पण, आज एका प्रवाशाला विमानतळावर असा अनुभव आला आहे; जो कदाचित तुम्हालाही माणूस आणि एक कर्मचारी म्हणून आपण कसं असावं हे नकळत तुम्हाला सांगून जाईल.

@linked युजर धीरज गोल्यान यांनी इंडिगोच्या कर्मचारी चंदनशी झालेली भेट अगदी अविस्मरणीय ठरली आहे. धीरज गोल्यान यांनी इंडिगोच्या चेक-इन काउंटरवरील कर्मचाऱ्याचा फोटो शेअर केला आहे. प्रवाशाची मदत करणाऱ्या कर्मचाऱ्याला ऐकायला आणि बोलायला येत नव्हतं असे त्याच्या बॅचवर लिहिले होते. तेव्हा प्रवाशाला प्रश्न पडला की, आता यांच्याबरोबर संवाद कसा साधला जाणार? पण, कर्मचाऱ्याच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि बोलक्या हावभावाने प्रवाशाचे चेक-इन अगदी जलद आणि सोपं करून दिले. त्यामुळे युजरच्या आयुष्यातला हा एक उत्तम अनुभव होता.

आत्मविश्वास, सहानुभूती आणि कार्यक्षमता (Viral Post)

एवढेच नाही तर त्यांनी आपत्कालीन दरवाजाजवळ साध्या सीटपेक्षा जास्त जागा असणाऱ्या लेगरूम सीट देण्यासाठी आणि काही किलो अतिरिक्त सामान माफ करण्यासाठीही प्रयत्न केले. त्या कर्मचाऱ्याने ऐकायला आणि बोलायला न येण्याची अडचण न पाहता, किती छानपणे काम केले याबद्दल प्रवाशाला कौतुक वाटले. त्याच्या सेवेतून आत्मविश्वास, सहानुभूती आणि कार्यक्षमता दिसून येत होती; ज्याचा कोणत्याही दर्जाच्या विमान कंपनीला अभिमान वाटेल. अशा व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी आणि ग्राहकांसमोर काम करण्याच्या जबाबदाऱ्या देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी संधी दिल्याबद्दल प्रवाशाने इंडिगो एअरलाइन्सला खूप मोठा सलाम दिला.

पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर ही पोस्ट @linked या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच कॅप्शनमध्ये “कर्मचाऱ्याची वागणूक ही फक्त कामापूर्ती मर्यादित नसून जीवनाबद्दल प्रेरणा देणारी आहे” ; अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे. इंडिगोने पोस्ट पाहून “मिस्टर गोलियन, तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आमच्या टीममधील सदस्यांचा अभिमान आहे” तर अनेक युजर्स “तुमचा दृष्टिकोन तुमची उंची ठरवतो”, ” अप्रतिम, आशा आहे की सर्व एअरलाइन्स सर्वांना समान संधी देतील”; आदी अनेक भावना कमेंट्समध्ये नेटकरी करताना दिसत आहेत.