Viral Post Shows Cab Driver Printed Six Rules : शहरातील नागरिकांच्या सुविधा वाढविण्यासाठी वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये एसी ट्रेन, एसी बस, मेट्रो, मोनो रेल, ओला-उबर कॅबचा समावेश आहे. पण, अनेकदा जास्त पैसे घेण्यावरून किंवा राईड कॅन्सल करण्यावरून कॅबचालक व प्रवाशांमध्ये भांडणं होताना दिसतात, त्यामुळे अनेकदा असे व्हिडीओ किंवा पोस्ट (Viral Post) सोशल मीडियावर व्हायरल होतात. तर ही गोष्ट घडूच नये यासाठी एका कॅबचालकाने एक भलीमोठी यादी कॅबमध्ये लावली आहे आणि काही नियम प्रवाशांच्या सीटसमोर पोस्टरसहित चिटकवले आहेत.

व्हायरल पोस्ट (Viral Post) Reddit वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका अज्ञात व्यक्तीने प्रवासासाठी कॅब बुक केली. कॅब व्यक्तीच्या रहिवासी ठिकाणी पोहचते, अज्ञात व्यक्ती त्यात बसते. बसल्यानंतर अज्ञात व्यक्तीला दिसतं की, सीटसमोर एक पोस्टर लावण्यात आलेलं असतं, जे पाहून अज्ञात व्यक्ती थक्क होऊन जाते. नक्की काय लिहिलं आहे या पोस्टरमध्ये ते व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘आवाज असावा तर असा…’ बाबाने गायलं गाणं, लेकाने हातात घेतली गिटार अन्…; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल

पोस्ट नक्की बघा…

I have booked a cab and the cab driver mentioned some guidelines on the cab! What do you about these guidelines?
byu/Your_Friendly_Panda inCarsIndia

तुमचा अ‍ॅटिट्यूड खिशात ठेवा :

पोस्टमध्ये (Viral Post) तुम्ही पाहिलं असेल की, एकाखाली एक सहा नियम लिहिण्यात आले आहेत.
१. तुम्ही या कॅबचे मालक नाही आहात.
२. कॅब चालवतोय तो या कॅबचा मालक आहे.
३. नम्रपणे बोला.
४. कॅबचा दरवाजा हळू बंद करा.
५. तुमचा अ‍ॅटिट्यूड खिशात ठेवा, कारण तुम्ही प्रवासादरम्यान आम्हाला जास्तीचे पैसे देत नाहीत.
६. मला दादा (भैया) म्हणू नका.
तसेच लाल रंगात लिहिलं आहे की, तुम्हाला वेळेत पोहचायचं असतं म्हणून आम्हाला कॅब वेगाने चालवायला सांगू नका. आदी अनेक नियम लिहिलेलं पोस्टर कॅब मालकाने प्रवासी सीटच्या समोर लावलेलं दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट Reddit ॲपच्या @Your_Friendly_Panda या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी कॅबचालकाच्या नियमांबद्दल चर्चा करताना, तर काही जण दादा (भैया) का म्हणायचं नाही या मुद्द्यावर वाद घालताना कमेंटमध्ये दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे