शहरांमध्ये किंवा गावच्या अनेक रस्त्यांवर तुम्हाला एखादा तरी केशकर्तनकार आढळेल; ज्यांच्याकडे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण केस कापायला जातात. तसेच हे केशकर्तनकार अनेकदा तुम्ही बोलावलं, तर तुमच्या घरीदेखील केस कापण्यासाठी हजर राहतात. पण, सध्याच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की, अनेक ऑफरसह विविध कंपन्यांचे सलून या व्यवसायात उतरले आहेत; जे अनेक तरुण मंडळींना आकर्षित करतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एका दिल्लीत राहणाऱ्या केशकर्तनकाराची चर्चा होत आहे.

एक्स (ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात एक केशकर्तनकार आणि त्याच छोटंसं दुकान आहे. व्यक्तीनं दिल्लीच्या रस्त्याकडेला त्याचं एक दुकान मांडलं आहे. त्यात एक खुर्ची, एक छोटा आरसा आणि केस कापण्यासाठी काही उपयोगी वस्तू ठेवल्या आहेत. तसेच खास गोष्ट अशी की, हा केशकर्तनकार केस कापण्यासाठी ग्राहकांकडून फक्त ५० रुपये घेतो. दिल्लीच्या पॉश मार्केटमध्ये हा केशकर्तनकार फक्त ५० रुपयांमध्ये केस कापून देतो. एका डिजिटल मार्केटरने या केशकर्तनकारासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा…कंपनीने मुलाखतीत महिलेला विचारला अजब प्रश्न, उत्तर नेमकं द्यावं तरी काय? स्क्रीनशॉट व्हायरल; वाचा नेमकं प्रकरण!

पोस्ट नक्की बघा :

केस कापण्यासाठी घेतात ५० रुपये :

युजरने केशकर्तनकार आणि त्याचा फोटो पोस्ट करून लिहिले की, दिल्लीतील जीके२ एम (GK2 M) ब्लॉक मार्केटमधील रस्त्याच्या कडेच्या दुकानात रोहतास सिंग केस कापण्यासाठी ५० रुपये घेतात. त्याच मार्केटमध्ये त्याची स्पर्धा – टोनी ॲण्ड गाय, ट्रूफिट ॲण्ड हिल, गीतांजली आदी दुकानांबरोबर आहे आणि ही दुकाने ७०० ते २००० रुपये केस कापण्यासाठी घेतात. मी या सर्व दुकानांमध्ये गेलो आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो की, सर्व ठिकाणी केस कापण्याची पद्धत सारखीच आहे. छोट्या उद्योजकांना सपोर्ट करा, ते कदाचित लिंक इंडियावर सीईओ नसतील. पण, हेच व्यापारी अर्थव्यवस्थेला गती देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच युजरने केशकर्तनकाराचे नाव सांगत त्याचा मोबाईल नंबरदेखील कॅप्शनमध्ये नमूद केला आहे आणि आवर्जून सांगितले की, जर तुम्ही या केशकर्तनकाराच्या दुकानाजवळ राहत असाल, तर तो तुमच्या घरीदेखील केस कापण्यासाठी येऊ शकतो. सोशल मीडियावर ही पोस्ट शुभो सेन गुप्ता @shubhos यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. शुभो सेन गुप्ता हे एक डिजिटल मार्केटर आहेत. तसेच ही पोस्ट पाहून अनेक जण विविध प्रतिक्रिया मांडताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.