Viral Video Prime Minister Narendra Modi Interacting With Children : लाईटहाऊस जर्नालिझमला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांशी संवाद साधत असतानाच असा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसला. व्हिडीओमध्ये मुले पंतप्रधान मोदींना टीव्हीवर पाहिल्याचे सांगताना ऐकू येत आहेत. त्यानंतर त्यांनी, “काय करत होतो मी टीव्हीमध्ये”, असे विचारताच मुले मतचोरी (vote chori) करतात, असे उत्तर देताना दिसतात. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, व्हिडीओ जुना आणि बनावटदेखील आहे. मूळ व्हिडीओमध्ये मुलांनी ‘व्होटचोरी’, असे म्हटलेच नव्हते.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर चंदन कुमारने तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला. इतर युजर्सनीदेखील हा व्हिडीओ खरा समजून, त्याला प्रतिसाद दिला.
https://www.instagram.com/p/DOAYXFckX6w
इतर युजर्सही अशाच दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
त्यानंतर आम्ही कीवर्ड शोधून तपास सुरू केला. ‘माय बालवाटिका’ (My Balvatika) ही संज्ञा पार्श्वभूमीवर दिसत होती.
या कीवर्ड शोधाद्वारे, आम्हाला indianexpress.com वर ३१ जुलै २०२३ रोजी अपलोड केलेला एक लेख सापडला.
लेखाबरोबर वापरलेला फोटो व्हायरल व्हिडीओसारखाच होता.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षा समागमचे उदघाटन केले. या उदघाटनाचा कार्यक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० च्या तिसऱ्या वर्धापनदिनाबरोबर झाला. पंतप्रधान मोदींनी यावेळी आयोजित केलेले प्रदर्शनही पाहिले. प्रदर्शनात त्यांनी चार ते पाच वर्षांच्या मुलांच्या गटाशी संवाद साधला. लगेचच पंतप्रधान मोदींनी मुलांबरोबरच्या संवादाची एक क्लिप शेअर केली.
आम्हाला पीआयबी (PIB)वरही याबद्दलचा एक अहवाल सापडला.
https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1943966
शिक्षण मंत्रालयाने मुलांच्या भेटीदरम्यानचा कार्यक्रम आणि त्याच वेळी काढलेला फोटो यांबद्दलची पोस्टसुद्धा शेअर केली.
आम्हाला ते मुलांशी संवाद साधत असल्याचा व्हिडीओ ‘झी न्यूज इंग्लिश’ (Zee News English) या यूट्यूब चॅनेलवर सापडला.
संपूर्ण व्हिडीओमध्ये कोणत्याही मुलाने ‘मतचोरी’ या शब्दाचा वापर केलेला नाही.
ज्या मुलाचा त्यांनी हात धरला होता, तो फक्त त्यांना टीव्हीवर पाहिल्याचे पुन्हा पुन्हा सांगत राहिला आणि नंतर त्याने पंतप्रधान मोदींना मिठी मारली.
आम्हाला २९ जुलै २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स (ट्विटर) हँडलवरही हा व्हिडीओ सापडला.
संपूर्ण संभाषणादरम्यान मुलांचा ‘मतचोरी’ हा शब्द ऐकू आला नाही.
निष्कर्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुलांबरोबरचा व्हिडीओ, ज्यात मुले ‘मतचोरी’बद्दल बोलताना दिसत आहेत, तो व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खोटा, जुना व बनावट आहे.