Dubai shocking video : कामाच्या चांगल्या संधी, आकर्षक पगाराचे पॅकेजेस आणि उत्तम जीवनशैली यांमुळे सध्याच्या तरुणाईचा परदेशांतील नोकऱ्यांकडे अधिक कल आहे. मात्र, परदेशांत जाणे आणि तिथे उदरनिर्वाह करणे तितकेसे सोपे नाही. कारण- नोकरीच्या शोधात परदेशांत जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भारतातील तरुण दुबईला जाऊन भरपूर पैसा कमवून सेटल होण्याची स्वप्ने पाहत असतात. दुबईमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहत आहेत. दुबई हा केवळ प्रवासासाठीच नाही, तर परदेशांत नोकरी शोधण्यासाठीही सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की, दुबईमध्ये असं काय आहे की, भारतीय लोक दुबईकडे सर्वांत जास्त आकर्षित झाले आहेत.

नोकरीसाठी दुबईला जाण्याचा विचार करताय?

तुम्ही दुबईला जाण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दुबईमधला एक धक्कादायक सध्या समोर आला आहे. त्यामध्ये नोकरीसाठी गेलेल्या भारतीय तरुणांची परिस्थिती पाहून तुमचीही पाहून झोप उडेल.युनायटेड अरब अमिराती (UAE) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात उंच इमारती, अत्याधुनिक मॉल्स, सुंदर कारंजी आणि विस्तीर्ण रस्ते. यामुळं UAE मधली शहरं स्वप्नाहून सुंदर दिसतात. अबू धाबी असो वा दुबई, इथे इमारतींचं बांधकाम सतत होताना दिसतं. पण या शहराच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारे कामगार कसे राहतात. तुम्हीच पाहा कामगारांची अवस्था.

हा व्हिडीओ दुबईतला असून, तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशा प्रकारे मोठ्या संख्येने भारतीय लोक एकाच मोठ्या जागेत गर्दी करून राहत आहेत. लांबच लांब डबल बेड दिसून येत आहेत. मात्र, या बेडवर अनेक जण झोपल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ”दुबईमध्ये बांधकाम मजूर झोपलेले आहेत”, असे लिहिण्यात आले आहे. या कॅप्शनवरून तुम्हाला समजलेच असेल की, संपूर्ण हॉलमध्ये असलेले बेड कोणासाठी आहेत आणि त्यावर कोण झोपलेले आहे. या व्हिडीओवरून लांबून आलेल्या कामगारांची अवस्था काय आहे ते या व्हिडीओमधून दिसून येत आहे. मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या या कामगारांची अवस्था पाहवत नाहीये. त्यापेक्षा आपण भारतातच बरे होतो, असे यांना यावेळी नक्की वाटत असेल. अक्षरश: किड्या-मुंग्यासारखं यांचे जीवन असल्यासारखे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “सुख म्हणजे नक्की काय असतं?” बोरला पाणी लागल्यानंतर शेतकऱ्याला झालेला आनंद; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ the_construction_expert_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसेच यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एकानं म्हटलंय, “या बांधकाम कामगारांसाठी खूप वाईट वाटतं. दुबई आणि अमिरातीवर बहिष्कार टाका.” तर आणखी एकानं “आपल्याच देशात आपण बरे आहोत,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.