सिंहीण शिकार करते तेव्हा संपूर्ण जंगल हादरते. असं म्हणतात की जंगलाच्या राजा सिंहापेक्षा जास्त धोकादायक आणि भयंकर कोणी प्रहार करत असेल तर ती सिंहीण आहे. तिचा हल्ला इतका जोरदार असतो की कोणीही सुटू शकत नाही. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सिंहीण हवेतच भक्ष्य पकडते, अशी शिकार करण्याची कला तुम्ही पाहिली नसेल.

७ सेकंदात गेम संपला

हा व्हिडीओ फक्त ७ सेकंदांचा आहे. यामध्ये समोरचा प्राणी उडी मारून सिंहिणीचा हल्ला टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याने उडी मारताच सिंहिणीनेही समोरून उडी मारली. तिने थेट त्याच्या मानेवर दात टेकवले. शिकार जमिनीवर येताच तिची पकड लगेच मजबूत होते. यानंतर तिचा दुसरा साथीदारही मागून येतो.

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेटीझन्सला हा व्हिडीओ खूप आवडला आहे. nature27_12 या इंस्टाग्रम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याला आत्तापर्यंत १८ हजाराहून अधिक लोकांनी बघितला आहे.