Viral Video: विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी जंगलातील दोन विषारी नागांचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते दोन्ही नाग एकमेकांबरोबर भांडण करताना दिसत होते. दरम्यान, आता या व्हिडीओनंतर आणखी एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात दोन नव्हे तर तब्बल तीन विषारी नागांचे मिलन पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी प्रचंड व्हायरल होतात, ज्यात अगदी माणसांपासून ते प्राण्यांपर्यंतचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमुळे आपल्या अंगावर काटा येतो. आता असाच आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपासून यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात तीन विषारी नागांचे मिलन पाहायला मिळत आहे.

साधारणपणे आतापर्यंत दोन नागांचे मिलन आपण पाहिले आहे, ज्यात एक नाग आणि एक नागीण असल्याचे म्हटले जाते. परंतु, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तब्बल तीन नागांचे मिलन दिसतेय. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एका घराबाहेरच्या अंगाणामध्ये तीन विषारी नागांनी एकमेकांना गुंडळलेले असून तिघांचे मिलन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर नकळत काटा येईल.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Emate-TV या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “नाग, नागीण आणि ती…”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बापरे किती भयानक”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “नागाची गर्लफ्रेंडपण आहे वाटतं.”