Viral Video Girl Witty Answer: सोशल मीडियाच्या दुनियेत कोणता व्हिडीओ, कोणता किस्सा आणि कोणता प्रसंग एका क्षणात व्हायरल होईल याचा नेमका अंदाज बांधणं खरंच कठीण आहे. कधी साधा नाच करणारा व्हिडीओ ट्रेंड होतो, तर कधी अगदी गमतीशीर प्रश्नोत्तरं लोकांच्या हशा-पिकांतून चर्चेचा विषय बनतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चर्चेत आला आहे.

व्हिडीओमध्ये नेहमीसारखं एका मुलाखतीचं दृश्य आहे. एका तरुणानं पार्कमध्ये फिरणाऱ्या दोन मुलींना थांबवलं आणि विचारलं, “समजा तुम्ही एका दुकानातून पाच किलो बटाटे घेतले आणि दुसऱ्या दुकानातून पाच किलो समोसे घेतले… तर मला सांगा, कोणती पिशवी जड असेल?” प्रश्न ऐकताच अनेकांना वाटलं की मुलगी नक्की गोंधळेल आणि चुकीचं उत्तर देईल. कारण हे प्रश्न ऐकायला सोपे वाटतात, पण उत्तर द्यायला थोडे क्लिष्ट.

पण खरी कमाल झाली मुलीच्या उत्तरानं. क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, “समोशाची पिशवी जड असेल!” हे ऐकताच मुलाला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानं लगेच प्रतिप्रश्न केला, “दोघांचेही वजन पाच किलो आहे, मग दोन्ही पिशव्या समानच जड असणार ना?”

पण इथेच मुलीनं असा ट्विस्ट दिला की संपूर्ण व्हिडीओ धमाकेदार झाला. ती म्हणाली, “तुला माहीत नाही का? समोशासोबत चटणीही मिळते, त्यामुळे तीच पिशवी जड असणार!”

आता एवढ्या भन्नाट उत्तरानं आजूबाजूचे लोकच नाही तर हा व्हिडीओ पाहणारे हजारो नेटकरीही अक्षरशः हसून लोळले. काहींनी तर अगदी मजेशीर मीम्स तयार करून हा व्हिडीओ ट्रेंडिंग बनवला. KBC च्या सात कोटी जिंकण्याच्या सीनवर हा किस्सा जोडून “वाह दीदी वाह!” असं लिहिलेलं मीम व्हायरल झालं.

आज सोशल मीडियावर या मुलीच्या स्मार्ट उत्तराचं कौतुक होतंय. लोक म्हणतायत, “ही खरी दहापैकी दहा मार्कांची बुद्धिमत्ता!” काहींनी तर थेट तिचं कौतुक करत “समोशासोबत चटणीची आठवण फक्त हुशार लोकांनाच होते”, असं लिहिलंय.

या एका साध्या प्रश्नोत्तरानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, सोशल मीडियाचं जग किती वेगळं आहे. कधी कोणत्या क्षणी कोणता व्हिडीओ प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणेल, याचा नेमका अंदाज कुणालाच नसतो. पण, एवढं नक्की या व्हिडीओनं नेटकऱ्यांना हसवून विचार करायलाही लावलंय.

येथे पाहा व्हिडीओ

सामान्य गणितासारखा हा प्रश्न, पण मुलीने दिलेलं उत्तर इतकं अनपेक्षित होतं की ते ऐकून हशा, टाळ्या आणि मीम्सचा पाऊस पडला. नेटकरी आजही या उत्तरावरून भन्नाट चर्चा करतायत…