Viral Video: समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले विविध व्हिडीओ आपण नेहमीच पाहतो; त्यात बऱ्याचदा लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांबरोबरचे व्हिडीओदेखील शेअर करीत असतात. या व्हिडीओंमध्ये अनेकदा लोक आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळताना, तर कधी मजामस्ती, तर कधी भांडण करतानाही दिसतात. पाळीव प्राण्यांबरोबरची मजामस्ती पाहणे नॉर्मल गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क वाघाबरोबर खेळताना दिसली होती. दरम्यान, अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक व्यक्ती तरसाबरोबर खेळताना दिसत आहे.

तरस हा जंगलातील एक असा प्राणी आहे की, ज्याला बिबट्या, सिंहदेखील घाबरतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये बिबट्याने केलेली शिकार स्वतः तरस प्राण्याला आणून दिली होती. दरम्यान, हिंस्र प्राण्याबरोबर एक व्यक्ती मजामस्ती करताना दिसत आहे; जे पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, एक व्यक्ती तरस प्राण्याबरोबर खेळत आहे. अधून-मधून ही व्यक्ती या प्राण्याला हाताने कुरवाळताना दिसत आहे. त्याशिवाय यावेळी तो त्याचे चुंबनही घेतो. या व्यक्ती आणि प्राण्याचे गोड बाँडिंग पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @Nature is Amazing अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “वन्यजीव चाहत्याची एका हायनाशी मैत्री झाली”, असे लिहिले आहे.

हेही वाचा: ‘यालाच खरं प्रेम म्हणतात का?’ स्टंटच्या नादात प्रेयसीचा जीव घातला धोक्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “ही व्यक्ती इतर प्राण्यांचीही मित्र आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बापरे, ही व्यक्ती सिंहबरोबर खेळतो.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “यांचं बाँडिंग भारी आहे.” इतर युजर्सही हा व्हिडीओ पाहून ते खूप घाबरले, असे सांगत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये एक तरुणी वाघाबरोबर खेळताना दिसली होती. दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क बिबट्याबरोबर सेल्फी घेताना दिसला होता.