Biker Dangerous Stunt: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काहीतरी व्हायरल होतच असतं. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. त्यातील काही अपघात नकळत झालेले असतात; तर काही अपघात मुद्दाम स्टंट करण्याच्या नादात घडतात. सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात गाडीवर बसलेल्या जोडप्याबरोबर स्टंट करायच्या नादात असं काहीतरी होतं, जे पाहून नेटकरीदेखील तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालवताना रील्स तयार करणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंट करणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा अनेकविध गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. या व्हिडीओमधील तरुण बाईकवर असाच स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण, यावेळी त्याच्यामागे बसलेल्या गर्लफ्रेंडला दुखापत होते.

village is changing but the question is the direction of the change
गाव बदलत आहे… प्रश्न आहे बदलाच्या दिशेचा
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
Environmentalists allege that some trees were uprooted outside the Metro 3 station
‘मेट्रो ३’ स्थानकाबाहेरील काही वृक्ष उन्मळून पडल्याने पर्यावरणप्रेमींचा आरोप
Girls' Stunning dance on Mahabharat tital song
‘महाभारत’च्या टायटल गाण्यावर थिरकल्या मुली, डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
Pistol-carrying goon pune, Pistol pune,
पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला नदीपात्रात पकडले
Woman In Bengaluru Killed Body Chopped
Bengaluru Murder : महालक्ष्मी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गुन्ह्याची कबुली

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील असून, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर बऱ्याच गाड्या ये-जा करताना दिसत आहेत. त्याच रस्त्यावर एक जोडपेदेखील बाईकवरून जाताना दिसतेय. पण, पुढे गेल्यावर अचानक बाईक चालवणारा तो तरुण स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो गाडीचे चाक पुढच्या बाजूने उचलतो; पण त्याच्यामागे बसलेल्या प्रेयसीचा हात सटकतो आणि ती सरळ गाडीच्या मागच्या चाकावर पडते. यावेळी प्रेयसीला जोरात लागल्यामुळे ती जोरजोरात किंचाळते. त्यावेळी तो तरुण गाडी थांबवतो. तरुणीचे नशीब चांगले म्हणून तिचा जीव वाचला; पण स्वतःच्या जीवाशी केलेला हा स्टंट पाहून नेटकरीही तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wb_rider_sayan_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल २४९ दशलक्ष व्ह्युज आणि दोन दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याशिवाय युजर्सही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ…’ गाण्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जबरदस्त सादरीकरण; VIDEO पाहून तुम्हालाही येईल शाळेची आठवण

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

यावर एकाने लिहिलेय, “याला म्हणतात शिक्षा.” दुसऱ्या एकाने लिहिलेय, “यांच्याबरोबर असचं झालं पाहिजे.” आणखी एकाने लिहिलेय, “हा व्हिडीओ यांच्या घरच्यांनी पाहिला, तर काय होईल?” आणखी एकाने लिहिलेय, “हे तर मोये मोये झाले.” तसेच भररस्त्यावर जीवघेणा स्टंट केल्यामुळे आणि हेल्मेट न घातल्यामुळे अनेक जण त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीदेखील करीत आहेत.

दरम्यान, यापूर्वीदेखील असेच काही व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये दोन तरुणी स्कुटी चालवताना स्टंट करण्याच्या नादात जोरात पडल्या होत्या आणि आणखी एका व्हिडीओमध्ये एका जोडपे स्टंट करण्याच्या नादात अपघात घडला होता.