Viral Video: पुण्याचे लोक कधी काय करतील आणि कधी काय बोलतील याचा नेम नाही. पुण्यातील पुणेरी पाट्या, पुण्याच्या लोकांसंदर्भातील किस्से सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. सध्या पुण्यासोबतच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता मुंबईला ‘तुंबई’ म्हणणाऱ्या पुण्याचीही ‘तुंबई’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील बऱ्याच ठिकाणी पाणीदेखील साठलेले आहे. पण, साठलेल्या या पाण्याचे टेन्शन न घेता एक तरुण पाण्यात मज्जा करताना दिसत आहे.

बऱ्याचदा पावसाचे पाणी साठले की, लोक घाबरतात, घरातून बाहेर पडत नाहीत. पण, समाजात असेही काही अतरंगी लोक असतात; जे अशा क्षणांचा आनंद लुटतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात पुण्यातील येरवडा परिसरात साठलेल्या रस्त्यावरील पाण्यावर जाड मॅट टाकून, त्यावर तो झोपला होता. यावेळी पाण्यासह त्याची मॅटही वाहून जात होती. या तरुणाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण पुण्यातील येरवडा परिसरात साठलेल्या पाण्यात एका टायरवर बसून पावसाचा आनंद लुटत आहे. त्याशिवाय त्याच्या मागे असलेली आणखी काही लहान मुलंही पाण्यात मजा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “आता पुण्यात फिरायला बाईक सोडून बोटच घ्याव्या लागणार आहेत वाटतं.”

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mipunekar.in या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये, ‘या वर्षी पावसानं पूर्ण पुण्याचं वॉटर पार्क करून टाकलंय’, असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि चार हजारहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: छोटा पॅकेट, बडा धमाका! बैलाला बकरीने दिली अशी खुन्नस अन् पुढे जे घडलं… थरारक VIDEO पाहून फुटेल घाम

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलेय, “एक बोट घेऊनच टाक. एवढा पावसाळा टेन्शन नाही राहणार.” तर दुसऱ्याने लिहिलेय, “पुण्यातही मुंबईसारखी गर्दी झाल्यावर असंच होणार.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “नवीन वॉटर पार्क!” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “पुण्याचा गचाळ आणि ढिसाळ विकास.”