Dance Viral Video: सोशल मीडियावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा एका कार्यक्रमातील डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय. ही महिला या व्हिडीओमध्ये ‘सरिया करियायी के लाई’या फेमस भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, ज्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या घरामध्ये ‘सरिया करियायी के लाई’ या फेमस भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या महिलेचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत २८ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलंय की, “आजी छान नाचलात” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “जबरदस्त डान्स”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “किती सुंदर डान्स करतायत काकू”