Viral Video: हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.
आजकाल सोशल मीडियामुळे कोणताही विषय किंवा कोणतीही जुनी कला लोकांपर्यंत पोहचवणे सहज शक्य झाले आहे. सोशल मीडियाद्वारे लोप पावत चाललेली लोककला जोपसणारे आणि लोकांपर्यंत पोहचवणारे लोक फार कमी आहेत. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘बाई सुया घे ग दाभन घे’ हे गाणं खूप चर्चेत आहे. ज्यावर अनेक जण मराठमोळ्या वेशात या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली मराठमोळ्या पद्धतीने तयार होऊन ‘बाई सुया घे ग दाभन घे’ गाण्यावर अभिनय करताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे गोड अभिनय तुमचंही लक्ष वेधून घेतील. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lil.singer.riya या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त”, आणखी एकाने लिहिलेय, “खूप क्यूट.”