viral Video: आताच्या काळात कुठलाच कार्यक्रम हा फोटो आणि रील काढल्याशिवाय पूर्ण होत नाही. मग ते लग्न, वाढदिवस, बारसं असो किंवा एखादा खास दिवस. या फोटो आणि रीलमुळे कार्यक्रमातील खास क्षण कॅमेरामध्ये कैद होतात. मग ते क्षण आपण कितीतरी वर्ष स्वतःजवळ जपून ठेवू शकतो. तर हीच गोष्ट लक्षात ठेवून एका व्यक्तीने त्याचे लग्न आणखीन खास केलं आहे. आज सोशल मीडियावर अशा एका नवरदेवाची चर्चा होत आहे, ज्याने त्याच्या लग्नातली प्रत्येक विधी करताना रील शूट केला आहे.

आपलं लग्न आपल्याला हवं तस्संच व्हावं अशी प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. पण, या नवरदेवाचा अनोखा उत्साह पाहून कोणालाही नवल वाटेल एवढं नक्की. नवरदेवाचे नाव राजा आहे आणि हा बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी आहे. नवरदेव एक ब्लॉगर असून त्याचे सोशल मीडियावर युट्यूब आणि इन्स्टाग्राम ॲपवर ‘राजाब्लॉग्स’ नावाचे चॅनेल आहे. तर राजा या ब्लॉगरचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले. या लग्नाच्या एका विधीदरम्यान म्हणजे नवरीला मंगळसूत्र घालून कुंकू लावण्यात येते तेव्हा हा नवरदेव विधी सोडून पहिला ‘दो अंजाने अजनबी’ या गाण्यावर लिप-सिंक करत रील शूट करतो आहे.

हेही वाचा…१० रुपयांची नाणी देऊन खरेदी केली इलेक्ट्रिक दुचाकी; कंपनीच्या सीईओची सोशल मीडियावर पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा :

पण, लग्नातील फक्त हा एकच विधी नाही, तर वरात घेऊन जाणे, वरमाला, सप्तपदी, मंगळसूत्र घालून कुंकू लावणे इथून ते लग्नानंतर गृहप्रवेश, पहिली रात्र ते फिरायला जाताना कुटुंबाबरोबरचा इंडिगो विमान प्रवास इथपर्यंत प्रत्येक क्षणाचे वेगवेगळे रील व्यक्तीने शूट केले आहेत आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. लग्न समारंभातील प्रत्येक विधीचा “रील कंटेंट” तयार करून या ब्लॉगरने इन्स्टाग्रामवर चार दशलक्ष फॉलोअर्स मिळवले आहेत आणि सोशल मीडियावर अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajababu Kumar (@raja_vlogs1123)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हे सर्व व्हिडीओ @Raja Vlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. या नवरदेवाचा उत्साह पाहून अनेक जण चकित झाले आहेत. तर काही नेटकरी ‘फक्त रीलसाठी लग्न केलं आहे का?’, ‘अरेंज मॅरेज भीतीदायक आहे’; अशा अनेक कमेंट व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.