कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओ अचानक हल्ला करणाऱ्या कुत्र्यांचे असतात तर काही व्हिडीओ कुत्र्यांना बेदम मारहाण करतानाचे असतात. एकीकडे कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. काही लोक भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहे तर दुसरीकडे प्राणीप्रेमी कुत्र्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात लढा देत आहे. अशा परिस्थिती एक अनपेक्षित व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक दुचाकीस्वार उत्तर प्रदेशातील आग्रा महानगरपालिकेच्या वाहनातील काही कुत्र्यांना मुक्त करताना दिसत आहे.. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महापालिकेने पकडलेल्या सुमारे ८-१० कुत्र्यांना दुचाकीवरून वाहनाचा पाठलाग करणाऱ्या एका व्यक्तीने मुक्त केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप समजू शकलेले नाही, तथापि, कुत्र्यांना घेऊन जाणारे वाहन आग्रा नगर निगमचे असल्याने व्हिडिओ आग्रा येथे शूट केला जात असल्याचे सांगितले जाऊ शकते.
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहेय शनिवारी (२७ जानेवारी) हा व्हिडिओ इंटरनेटवर आला आणि अनेकांनी पाहिला. महापालिकेचे वाहन काही कुत्र्यांना त्यांच्या भागातून इतर ठिकाणी घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दुचाकीस्वार महामार्गावर सामान्य वेगाने जात असलेल्या वाहनाचा पाठलाग करत होता. या वाहनामध्ये काही कुत्रे बंदिस्त असल्याचे दिसत आहे. वाहनाच्या जवळ गेल्यावर तो माणूस पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो बंदिस्त कुत्र्यांना मुक्त करतो. कुत्रे चालत्या वाहनातून खाली उतरू लागतात. एकापाठोपाठ एक सर्व कुत्रे त्या वाहनातून उतरातात आणि तेथून पळ काढतात.
महापालिकेने ताब्यात घेतलेले कुत्रे पळाले
‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये “आग्रा महानगरपालिकेच्या ताब्यातून अनेक कुत्रे पळून गेले” असा उपहासात्मक दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओला नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण दावा करतात की, “त्या माणसाने योग्य केले आहे” आणि इतर दावा करतात की,”कुत्र्यांना सोडले जाऊ नये.” एकाने असेही सांगितले की, महापालिकेने कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडते जिथून ते त्यांना उचलतात.
हेही वाचा – मुंबईत लोकल रेल्वेच्या रुळावर मांडली चुल! जीव धोक्यात टाकून रुळावर झोपणाऱ्या लोकांचा Video Viral
रस्त्याच्या मधोमध ‘त्यांना सोडायला नको होते
एकजण म्हणाला की, “कुत्र्यांना असे रस्त्याच्या मधोमध सोडले जाऊ नये कारण त्यांना परिचित नसलेल्या भागातील इतर कुत्रे त्यांना त्रास देतात आणि त्यांना मारतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दुचाकीस्वाराने शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.