Brother’s Emotional Letter Wins Hearts Online : भावा-बहिणीचे नाते हे जगावेगळ आणि अतूट असते. नात्यातील प्रेम जिव्हाळा आपुलकी जवळ असल्यावर सांगता येत नाही आणि दाखवता येत नाही. पण, दोघांच्याही कृतीतून त्यांचे प्रेम स्पष्ट दिसत असते. एकमेकांशी सतत भांडणारे, पण गरज लागल्यावर एका कॉलवर हक्काने धावून जाणारी हीच भावंडे असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये लाडक्या भावाने भाऊबीजेचं दिलेलं गिफ्ट पाहून बहिणीला अक्षरशः रडू कोसळले आहे.

भाऊबीजेला साडी, पैसे, चॉकलेट किंवा अगदी टॉप, ड्रेस आदी अनेक गोष्टी आपल्याला भेटवस्तू म्हणून मिळतात. पण, आज एका भावाने बहिणीला चक्क स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र दिले आहे. बहिणीने हे पत्र हातात घेऊन मोठ्याने वाचले आणि प्रत्येक शब्द वाचताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगले.

तर भावाने लिहिलेल्या पत्रात असं लिहिलं होतं की…

प्रिम दिदी

आज छोटीशी भेट माझ्याकडून खास तुझ्यासाठी. दीदी तू म्हणजे आमच्या घराचं सुखाचं ठिकाण आहेस. वाईट काळात नेहमी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणारी. “काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना” असं म्हणणारी माझी आधारवड बहीण. तू घरी आलीस की, घरचं सगळं वातावरण उजळून जातं. अधिरा सोबतचा टाईम… माहिती आहे मी जास्त वेळ देत नाही; पण, जेव्हा टाईम तिच्याबरोबर घालवतो, तेव्हा वेळ कसा जातो हे समजत नाही. मनापासून वाटतं, तू नेहमी असंच आमच्याबरोबर रहावं. त्याचबरोबर आता अजून एक नवीन, छोटं आनंदाचं कारण येतंय. तुझ्या आयुष्यातला तो नवा गोड जीव आमचं घर अजून उजळवून टाकेल; याची खात्री आहे.

भावाचं प्रेम वेगळंच असतं ताई (Viral Video)

दीदी, आपल्यात कितीही छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण झालं तरीही तू माझ्यासाठी नेहमी तशीच खास राहशील. कारण – मोठी बहीण म्हणजे आधार, प्रेम आणि नात्याचा खरा अर्थ ; असं पत्र लाडक्या भावाने बहिणीसाठी लिहिले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rasikashaha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “एक वेगळी भाऊबीज. हीच खरी संपत्ती- एक असा भाऊ, जो प्रत्येक वेळी पाठीशी उभा राहतो” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडिओ पाहून “खूप भारी लिहिलं आहे”, “ताई नशीबवान आहात. असा भाऊ मिळालाय तुम्हाला”, “नशीबवान आहात दोघपण”, “हे लिहिलेलं पत्र मला डीएम कर दीदी”, “भावाचं प्रेम वेगळंच असतं ताई” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.