Viral Video Shows Musical Chair Game : जेव्हा संपूर्ण जग आपल्याविरोधात उभं असतं. तेव्हा हक्काचा तो एक मित्र आणि ती मैत्रीण आपल्याबरोबर उभे असतात. कारण – मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. एखाद्या कठीण परिस्थितीत आपल्याला रस्ता दाखवेल, सुख-दुःख आपल्याला येऊन सांगेल, वेळोवेळी चूक दाखवून देईल. असा एक मित्र प्रत्येकालाच हवा असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये दोन चिमुकल्यांनी मैत्री पाहायला मिळाली आहे.

लहान मुलांमध्ये संगीत खुर्ची हा कार्यक्रम सुरु असतो. गाणे थांबते आणि चार मुलांमध्ये फक्त तीनच खुर्च्या ठेवलेल्या असतात. दोन मुलं पटकन खुर्च्या खाली आहेत तिथे बसून घेतात. पण, एक खुर्ची रिकामी असते त्याकडे दोन उर्वरित मुले बघत असतात. एक चिमुकला तर अगदी खुर्चीच्याजवळ उभा असतो तरी तो बसायाला जात नाही आणि आपल्या लाडक्या मित्राकडे बघून ‘अरे तू बस’ असे अगदी दोनदा इशाऱ्यात म्हणतो. हे बघून उपस्थित सगळेच थक्क होऊन जातात आणि चिमुकल्याचा आई त्याला येऊन मिठी मारते.

तो खेळ हरला; पण त्याने मन जिंकली (Viral Video)

मैत्रीमध्ये कोणतीही स्पर्धा नसते. कोणीही जिंकूदे किंवा हरूदेत आनंद आणि दुःख दोघांनाही समान व्हायला पाहिजे; आज त्याचेच प्रात्यक्षिक व्हिडीओत बघायला मिळाले. मित्र जिंकला नाही म्हणून आपली जागा बसायला देऊन त्याने हा खेळ नाही तर सगळ्यांची मन जिंकली आहेत. लहान मुले इतरांना स्वतःची खेळणी सुद्धा देत नाहीत. पण, या चिमुकल्याचा समजूतदारपणा आणि या लहानश्या वयातील त्याचे मित्राप्रती प्रेम पाहून सगळेच थक्क झाले आहेत आणि कौतुक करत आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @540fp या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “मैत्री आणि खेळ” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “तो खेळ हरला; पण त्याने मन जिंकली “, “तो माझ्या नजरेत आधीच विजेता आहे”, “तो नक्कीच आयुष्यभर असाच जिंकत राहणार, खूप चांगले संस्कार आहेत”, “त्या लहान मुलांनाही कळलं”, “याला म्हणतात मैत्री” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.