Dad Gift Rolls Royce Car To One Year Old Daughter Viral video : मुलाचा पहिला वाढदिवस हा प्रत्येक पालकांसाठी खास दिवस असतो. त्यासाठी आई-बाबा अगदी महिनाभर आधीपासूनच तयारी करायला सुरुवात करतात. हॉल बुक करण्यापासून ते अगदी कोणत्या थीमचा केक आणायचा, तर अगदी मुलाची हॉलमध्ये एंट्री कशी होणार याबद्दल अगदी सगळं ठरलेलं असतं. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. बाबांनी तिच्या लेकीच्या पहिला वाढदिवसासाठी चक्क महागडी गाडी भेट म्हणून दिली आहे. पण, हे पाहून नेटकरी बाबांना ट्रोल करताना दिसत आहेत.
दुबईमध्ये राहणारे भारतीय उद्योगपती सतीश संपाल सध्या त्यांच्या अनोख्या कृतीमुळे चर्चेत आहेत; ज्या गोष्टीची अनेक लोक आयुष्यभर स्वप्न पाहतात. तीच गोष्ट सतीश यांनी त्यांच्या मुलीला म्हणजेच इसाबेला संपालला तिच्या पहिला वाढदिवसाला भेट दिली आहे. बाबांनी लेक इसाबेलासाठी अटलांटिस येथे आयोजित एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वाढदिवसाच्या कार्यक्रमात काही बॉलीवूड सेलिब्रिटी तमन्ना भाटिया, राहत फतेह अली खान, आतिफ असलम व नोरा फतेही उपस्थित होते.
त्यांनी लेकीसाठी एक आलिशान, कस्टम-मेड गुलाबी रोल्स-रॉइस कार भेट म्हणून दिली. या कस्टमाइज्ड रोल्स-रॉइसमध्ये पुढच्या व मागच्या सीटवर इसाबेलाचे नाव लिहिलेले आणि सीटवर गुलाबी व पांढऱ्या रंगाचे कव्हर आणि टेडी बेअर ठेवलेले दिसत आहेत. कारच्या आतमध्ये प्लाकवर “अभिनंदन, इसाबेला”, असेसुद्धा लिहिलेले दिसते. ही गाडी इंग्लंडमध्ये कस्टमाइज्ड करण्यात आली आणि बाबांच्या लाडक्या लेकीसाठी खास यूएईला पाठवण्यात आली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये कारकडे पाहून लेकीचाही आनंद गगनात मावत नाहीय. ती जोरजोरात टाळ्या वाजवत असताना तिच्या चेहऱ्यावरही आनंद झळकताना दिसतो. त्यानंतर सतीश त्यांची मुलगी इसाबेलाच्या हातात कस्टमाइज्ड लक्झरी कारच्या चाव्या देतात.
व्हिडीओ नक्की बघा
ती पुढचे १७ वर्ष हे गिफ्ट वापरूनच शकत नाही (Viral Video)
व्हायरल झालेला व्हिडीओ ‘loveindubai’ वर आणि ‘marketing.growmatics’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता. “दुबईमध्ये सतीशने त्यांच्या मुलीला कस्टम-बिल्ट रोल्स-रॉइस भेट दिली’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. पण, व्हायरल व्हिडीओ पाहून युजर्स संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत कोण म्हणतंय, “तिला गरज तर बेबी सीटरची आहे”, “लोक त्यांचे पैसे त्यांच्या मनाप्रमाणे खर्च करतात. पण, तरीही जेव्हा काही धर्मादाय संस्थांना मदत करण्याची वेळ येते तेव्हा हे लोक मागे फिरतात आणि इकडे एका लहान मुलाला रोल्स रॉईस गिफ्ट म्हणून दिली जाते आहे हे पाहणे दुःखद आहे”, “ती पुढची १७ वर्षं हे गिफ्ट वापरूच शकत नाही”, “लेकीची हौस की स्वत:चा मोठेपणा” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.