Viral Video Dentist Treatment Brings Back Grandmothers Smile : आजी-आजोबा आयुष्यभर बरोबर राहावेत असे प्रत्येक नातवंडांना वाटते. त्यांच्या साधेपणा, प्रेमळ स्वभाव, त्यांचा सहवासात राहणं, जुन्या गोष्टी ऐकणं हा एक मजेदार आणि लक्षात राहणारा एक सुखद अनुभव असतो. पण, आजच्या धावपळीच्या जगात, खेळ, अभ्यासात व्यस्त असल्यामुळे मुलांना आजी-आजोबांबरोबर पाहिजे वेळ घालवायला वेळ मिळत नाही. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पुन्हा एकदा तुम्हाला आजी-आजोबांच्या प्रेमळ सहवासाची आठवण करून देईल.
दात काढल्यानंतर जेव्हा कृत्रिमरीत्या का होईना पण ख-या दातासारखेच दिसणारे चावायला उपयोगी पडणारे असे दात बसवले जातात. तर व्हिडिओत आजीचे नवीन दात बसवण्यासाठी आजोबा तिला डेंटिस्टकडे घेऊन आले आहेत. दात बसवून झाल्यावर आजीची पहिल्यासारखी स्माईल परत आल्यावर आजोबा सुद्धा तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही आहेत. आजोबा आजीकडे बघून “छान” असे इशाऱ्यात म्हणतात. तेव्हा आजीची स्माईल आणि हावभाव सुद्धा अगदी बघण्यासारखे असतात.
किती तो निरागस आनंद (Viral Video)
सर्वात जास्त आपण आपल्या जोडीदारासह आयुष्याचा वेळ घालवत असतो. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपल्याला आपल्या आनंदापेक्षा जास्त मोठा वाटतो. त्यामुळे प्रेम म्हणजे आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर सतत आनंद असणे. आज आजी-आजोबांच्या नात्यातही तसेच काहीसे प्रेम बघायला मिळाले आहे; जे कदाचित तुम्हाला भावूक करून जाईल. आजीने दात बसल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आजोबाही खुश झाले आणि तिचे कौतुक करताना दिसले. एकदा बघाच हा प्रेमळ व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.facebook.com/reel/1652278042136030
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Lay Bhari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये “किती तो निरागस आनंद!” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “आजोबा नी किती कष्ट केले असतील काय माहीत ….आज्जी खुश आज्जा पण खुश”, “मिलियन डॉलर स्माईल”, “छान जोडी आहे दोघांची”, “विश्वासाने आणि साथीने मिळते असे निखळ प्रेम ” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.