Viral Video Disabled Man Falls Into Open Drain : पावसाआधी पालिकेने शहरातील गटारांची दुरुस्ती करणे खूप महत्वाचे असते. पावसाच्या प्रवाहामुळे गटारांची झाकणे गायब होतात, तुटतात; यामुळे अपघातांचा धोका होतात. गटारांची झाकणे उघडी व तुटलेल्या अवस्थेत राहिल्याने त्या ठराविक ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. असेच काहीसे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. उघड्या गटारांच्या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने गटारात पडून एका अपंग माणसाबरोबर मोठी दुर्घटना घडली आहे.

गुरुवारी दिल्लीतील इंदिरापुरम भागात महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. वैभव खंड येथील गौर ग्रीन सोसायटीमध्ये असलेल्या सुमारे १५ फूट खोल उघड्या गटारात हा अपंग माणूस पडला. स्कुटी चालक बर्गर खरेदी करण्यासाठी तिथे गेला होता. बर्गर खरेदी केल्यानंतर त्याने स्कुटी काढली. स्कुटी रिव्हर्स घेताना त्याने मागे वळून पाहिलंच नाही आणि मागचा टायर उघड्या गटारात गेला आणि थेट स्कुटीसकट तो गटारात पडला. ही घटना घडताच घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आणि दुकानदार मदतीला आले आणि शिडीचा वापर करून त्या माणसाला नाल्यातून बाहेर काढलं.

पाठीला झाली दुखापत (Viral Video)

ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने, कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही; फक्त त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार जुलै महिन्यात महानगरपालिकेने नाला साफ केला होता. पण, नाला झाकण्यासाठी ढाकण बसवले नव्हते; ज्यामुळे ही घटना घडली. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि महापालिकेच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांच्यावर टीका केली जात आहे. कारण – याआधीही अनेक वाहनचालक आणि अगदी लहान मुलेही नाल्यात पडल्या आहेत असे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

त्याचबरोबर धक्कादायक बाब अशी की, गेल्या महिन्यातच एक लहान मूल त्यात पडले होते. त्यांनी आरोप केला की, पालिका अधिकारी कारवाई करण्यापूर्वी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत. व्यापाऱ्यांनी तक्रार केली की, त्यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी बसवलेले रॅम्प महानगरपालिकेने काढून टाकले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Benarasiyaa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “सामान्य माणसांनी करावं तरी काय” ; अशा कमेंट करत घटनेवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.