Viral video: जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या जवळचे सर्वजण त्याच्या अंत्यविधीसाठी येतात. यावेळी प्रत्येकजण त्याच्या जाण्याच्या दु:खात बुडालेला दिसतो. त्या व्यक्तीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवून कुटुंबीयांनाही अश्रू अनावर झालेले असतात . तर काही लोक शोक व्यक्त करण्यासाठी येतात.मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण, यामध्ये अत्यंविधीला दुख: नाही तर आनंद व्यक्त करताना लोक दिसत आहेत. एवढंच नाहीतर मृतदेहाला खांदा देणारे लोक जोमाने नाचताना दिसत आहेत.असे क्वचितच घडते की एखाद्याच्या अंत्यविधीला उपस्थित असलेले लोक आनंदोत्सव साजरा करत आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर असा एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही गोंधळून जाल.

कारण या व्हायरल व्हिडिओमध्ये मृतदेहाला खांदा देणारे लोक जोमाने नाचताना दिसत आहेत. एवढेच नाही तर या अंत्ययात्रेत सहभागी झालेले सगळेच आंनदात आहेत. एवढंच नाहीतर डीजेसुद्धा वाजत आहे. डीजेच्या तालावर मृतदेहाला खांद्यावर घेऊन लोक नाचत आहेत. या अंत्ययात्रेत केवळ डीजेच वाजत नाही, तर ढोलकी वाजवणारेही दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार जणांनी मृतदेहाला खांदा दिल्याचे दिसून येते. हे लोक मृतदेह खांद्यावर ठेवताच नाचू लागतात. तर दुसरीकडे ढोलताशाही वाजत आहे. एखाद्याचे लग्न किंवा वाढदिवस साजरा होत असल्यासारखे वातावरण आहे. या अंत्ययात्रेत कोणीही दुःखी किंवा रडताना दिसले नाही, हे आश्चर्यकारक आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लोक असे का करत आहेत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पाणी उडवलं मुलीनं अन् मार खाल्ला मुलानं; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात हा कोणता न्याय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ९२ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका यूजरने म्हटले, ‘भाऊ, त्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल?’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘हा कसला अंत्यसंस्कार आहे.’ आणखी एका वापरकर्त्याने लिहले की “आदिवासी संस्कृतीनुसार, १०० वर्षांहून अधिक जगलेल्या व्यक्तीचे अंतिम संस्कार अशा प्रकारे केले जातात.”