Viral Video of Dog: सामान्यतः कुत्रे चांगले पाळीव प्राणी बनू शकतात. ते माणसांना मदत करू शकतात. कुत्रे देखील अशा अनेक गोष्टी करू शकतात की जे काम करण्यासाठी गाढव, घोडे, बैल वापरले जातात. आजकाल एक व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे ज्यामध्ये एक लहान कुत्रा पूर्ण समर्पणाने काम करताना दिसत आहे. तो पाण्यासाठी मार्ग बनवताना दिसत आहे. ट्विटर अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे जो व्हायरल होत आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे यामध्ये एक कुत्रा दिसत असून तो ट्रॅक्टरपेक्षा जास्त वेगाने जमीन खोदत आहे. त्याचा वेग आणि जमीन खोदण्याची हुशारी पाहून तुम्ही त्याची स्तुती करताना थकणार नाही.

व्हिडीओमध्ये पाण्याचा प्रवाह जमिनीवर वाहत असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबतचा एक कुत्रा त्या पाण्याच्या काठावरुन वेगाने चालत आहे आणि पायाने जमिनीवर मार्ग बनवत आहे. त्या कड्याच्या साहाय्याने पाणी एकाच दिशेने वाहत आहे. कुत्रा इतक्या वेगाने काम करत आहे की तो स्वतःला पाण्याने भिजू देत नाही.

(हे ही वाचा: Viral Video: १० कुत्र्यांवर एक मांजर ठरली वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल)

(हे ही वाचा: “माझ्या घरात पैसे…” खासदार असूनही IPL मध्ये का काम करतो? या प्रश्नावर गौतम गंभीर संतापला)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला ३५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर हजारो लोकांनी लाइक केले आहे. या व्हिडीओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.