Viral Video: घरात सगळ्यात पहिले उठून सगळ्यात शेवटी झोपणारी कुटुंबातील एकमेव सदस्य म्हणजे ‘आई.’ सकाळचा नाश्ता बनवण्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत कोणाला काय आवडतं हे बनवण्याची तिची लगबग सुरू असते. अनेकदा प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनवताना ती स्वतःच्या आवडी निवडी विसरून जाते. तर आज व्हायरल व्हिडीओत याच गोष्टीची आठवण एका महिलेने करून दिली आहे.

सोशल मीडियावर सध्या आज काय खायला बनवू? असं विचारून नवऱ्याच्या, तर मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. तर या ट्रेंडला अनुसरून हा खास व्हिडीओ बनवण्यात आला आहे. महिलेचं नाव डॉक्टर फाल्गुनी वासवडा असे आहे. महिला स्वतःसाठी फळांचे सॅलेड बनवत असते. पण, पुढे एक ट्विस्ट येतो. सॅलेड बनवताना डॉक्टर व्हिडीओत सांगताना दिसत आहे की, नवऱ्याला किंवा मुलाला आज डब्यासाठी किंवा खायला काय बनवू ? असे विचारण्यापेक्षा घरातील सर्वांसाठी काय बनवू असं व्हिडीओत विचारा… कशाप्रकारे स्त्रिया घरातील कामांच्या ताणामुळे, तर स्वयंपाकघरात जेवण बनवताना स्वतःची आवड बाजूला ठेवतात आणि इतरांच्या आवडीचे पदार्थ बनवतात. हा मुद्दा डॉक्टरांनी व्हिडीओत नमूद केला आहे. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…प्रवासात पोपटांना घेऊन जाणं पडलं महागात, बस कंडक्टरने दिलं ४४४ रुपयांचे तिकीट, मजेशीर पोस्ट व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा:

डॉक्टर फाल्गुनी वासवडा यांचा संदेश अगदीच हृदयस्पर्शी आहे. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर फळांचे सॅलेड बनवताना सांगत आहेत की, “आनंद देणाऱ्या गोष्टी करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्या आणि स्वतःला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करा”, म्हणजेच घरातील प्रत्येक स्त्रियांनी इतर सदस्यांच्या आवडीप्रमाणे स्वतःला खायला काय आवडतं हेसुद्धा बनवलं पाहिजे; असे आवर्जून सांगताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @falgunivasavada या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक महिलांनी कमेंटमध्ये प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच एका महिलेनं, ‘मला वांग्याची भाजी खूप आवडते, पण माझ्या नवऱ्याला आवडत नाही, त्यामुळे मी वांग्याची भाजी सगळ्यात शेवटी कधी खाल्ली आहे हे मला आठवतसुद्धा नाही’ अशी कमेंट केली आहे.